घरमहाराष्ट्र'त्या' नावाचं स्वागत करू, मजा येईल; राज्यपाल पदासाठी राणेंच्या नावावर राऊतांचं बोलकं विधान

‘त्या’ नावाचं स्वागत करू, मजा येईल; राज्यपाल पदासाठी राणेंच्या नावावर राऊतांचं बोलकं विधान

Subscribe

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हापासून महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. यामुळे महाराष्ट्राला लवकरंच नवे राज्यपाल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार चर्चा रंगत असल्या तरी नारायण राणे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले तर काय होईल, असा प्रश्न आज शिवसेना खासदार संजय राऊतांना विचारण्यात आला, ज्यावर राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया तितकीचं बोलकी आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

नियम आणि कायद्यानुसार, एखाद्या राज्याचा नागरिक, त्याच राज्याचा राज्यपाल होऊ शकत नाही. या देशात आणि राज्यात अनेक गोष्टी घटनाबाह्य होत असतात, असं काही घटनाबाह्य कृत्य केलं असेल तर आम्ही त्या नावाचं स्वागत करू, मजा येईल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केल आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून संजय राऊत आणि नारायण यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला पोहचला आहे. दोघांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. ज्यावरून राऊतांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. अशात नारायण राणेंचं नाव राज्यपाल पदासाठी चर्चेत असल्याने त्यावर राऊतांनी अगदी मिश्किल असं उत्तर दिलं आहे. अर्थात नारायण राणे महाराष्ट्राचे नाही तर दुसऱ्या राज्याचे राज्यपाल होऊ शकतात असा चर्चा आहे.

कसबा, चिंचवड निवडणुका होऊ नये म्हणून भाजपची धडपड सुरु

यावेळी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर बोलताना राऊत म्हणाले की, पहिल्या दिवसापासून सांगतोय, कसबा आणि चिंचवड दोन्ही मतदारसंघात निवडणुका होतील, भाजपची अजूनही निवडणुका होऊ नये म्हणून धडपड सुरु आहे. त्या धडपडीमागची भीती, अस्वस्थता स्पष्ट दिसतेय, कारण दोन्ही मतदार संघातील चित्र हे सरकार आणि भाजपला अजिबात अनुकूल नाही, ज्या आमदाराचं निधन झालं या दोन्ही आमदारांच्या कुटुंबियांप्रती सहानभूती आहे तरीही निवडणूक अपरिहार्य आहे. लोकांना बदल हवा असेल तर निवडणुक होणं गरजेचं आहे, असंही राऊत म्हणाले.

- Advertisement -

यावेळी चिंचवड पोटनिवडणुकीवरून राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. टिळक कुटुंबात उमेदवारी दिली तर महाविकास आघाडी निवडणूक बिनविरोधात करणार का? असा सवाल बावनकुळेंनी उपस्थित केला होत. ज्यावर राऊत म्हणाले की, जर तरच्या गोष्टीला काही अर्थ नसतो हे बावनकुळेंना सांगा. टिळक कुटुंबाची मोठी परंपरा आहे. तुम्हाला जेव्हा विधानसभेत, राज्यसभा निवडणुकीत, विधान परिषद निवडणुकीत मतं हवी होती, तेव्हा तुम्ही त्या आजारी महिला आमदारांना स्ट्रेचरवर आणलंत. त्यांचं कौतुक केलंत. आज जेव्हा वेळ आली, तेव्हा तुम्ही त्यांना तिकीट नाकारलंत. तुम्ही तिकीट जाहीर करा ना. मग आम्ही बघू. तुम्ही त्यांची उमेदवारी जाहीर करा, त्यांना अर्ज भरू द्या. उमेदवारी अर्ज शेवटच्या क्षणीही मागे घेता येतो.


संध्याकाळपर्यंत वाट बघतोय राजीनामा देऊन येतात की…; आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंतर राऊतांच मोठं विधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -