घरमहाराष्ट्रबलात्कार घटनेचं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं; संजय राऊतांचा विरोधकांवर...

बलात्कार घटनेचं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं; संजय राऊतांचा विरोधकांवर संताप

Subscribe

मुंबईतील साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून आता विरोधकांना सरकारला निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, चंद्रकांत पाटील यांनी हे प्रकरणा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी करत सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. अशातचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. साकीनाक्यातील दुर्दैवी घटनेचं राजकरणं करणं विरोधकांनी थांबवलं पाहिजे. असं राजकारणं करणं म्हणजे मृताच्या टाळूवरंच लोणी खाण्यासारखं आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी विरोधकांना सुनावले आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता काही ठिकाणी माणसं जमवण्याचे प्रकार सुरु झालेत. ते टाळायला हवे, या दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं म्हणजे त्या मृत महिलेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. ते काही काळ थांबलं पाहिजे, या घटनेतील आरोपींना नक्कीच कठोर शासन होईल, अस आश्वासनही राऊत यांनी दिले आहेत.

- Advertisement -

मुंबईत महिला कायम सुरक्षित

ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक.. मात्र मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम… जगभरातील सुरक्षित शहरांमध्ये मुंबई वरच्या स्थानी आहे. मात्र मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. ही घटना घडल्याने गदारोळ सुरु आहे. महिलाचा मृत्यू दुर्दैवी आहे.. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा कायदा सुव्यवस्थेचा नक्कीच प्रश्न आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रशअन असून राजकारण करु नका, गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचं राजकारण करु नये.कारण अशा घटना राज्याची मान खाली घालणाऱ्या आहेत असं राऊत म्हणाले.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा

पोलिसांना पीडित महिलेचं स्टेटमेंट घेता आलं असतं तर अनेक गोष्टींचा खुलासा झाला असता. तरीही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांच्या लिंकच्या साहाय्याने मुख्य आरोपीला अटक केली आहे, असं सांगतानाच मी सकाळपासून पाहात आहे. विरोधी पक्षाचे नेते आणि नेत्या सरकारवर आरोप करत काही भूमिका मांडत आहेत. त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतील या सर्वांनी या घटनेचा धिक्कार आणि निषेध नोंदवला आहे. आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. मग ती फाशीही असेल. ती होण्यासाठी सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला पाहिजे. मुख्यमंत्री ही मागणी मान्य करतील, असंही आश्वासन राऊतांनी दिले.

- Advertisement -

तिच्या जीवनाची विटंबना झालीय

या घटनेची तुलना निर्भया प्रकरणाशी केली जातेयं. तुलना करायला हरकत नाही कारण यात एका महिलेने जीव गमावला आहे. तिच्या जीवनाची विटंबना झालीय. महाराष्ट्रातल्या मातीत त्या काळात छत्रपती महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तोच मार्ग स्वीकारला आहे. अशा दुर्देवी घटना घडू नये म्हणून सरकारने अधिक कठोर पावलं उचलली पाहिजे. सरकार ते उचलल्या शिवाय राहणार नाही,असंही राऊत यांनी सांगितले.


Sakinaka Rape Case : चित्रा वाघ यांना अश्रू अनावर, “आम्ही भाषण, घोषणा देण्यापलीकडे काहीही करु शकलो नाही”


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -