घरताज्या घडामोडीहिंमत असेल तर मुंबईत येऊन सांगा; आम्ही 'मविआ'तून बाहेर पडू : संजय...

हिंमत असेल तर मुंबईत येऊन सांगा; आम्ही ‘मविआ’तून बाहेर पडू : संजय राऊत

Subscribe

"महाविकास आघाडीतून बाहेर पडा सांगत आहात, अरे हिंमत असेल तर मुंबईत येऊन सांगा. उद्धव ठाकरेंच्या समोर येऊन सांगा असे'' आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिले. अलिबागमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

“महाविकास आघाडीतून बाहेर पडा सांगत आहात, अरे हिंमत असेल तर मुंबईत येऊन सांगा. उद्धव ठाकरेंच्या समोर येऊन सांगा असे” आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना दिले. अलिबागमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. (Shiv sena leader sanjay raut slams rebel mlas)

या मेळाव्यात बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, “ठाण्याच्या भाईला आमचे इकडचे दादा भारी पडतील. ईडीने मला अटक केली तरी चालेल पण मी गुवाहटीला जाणार नाही”, असा टोलाही संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला.

- Advertisement -

“बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर आतापर्यंत २६० सेना जन्माला आल्या. यातील आता केवळ शिवसेना आणि भारतीय सेना या दोनच सेना शिल्लक राहिल्या आहेत. महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. पण दादा तुम्ही दिग्यांसाठी फटके खाल्ले आता फटके देण्याची वेळ आली आहे. आज जर जनसागर उसळला तर, काय होईल म्हणून लपून बसलेत.”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

नवी मुंबई विमानतळाला शेतकरी कामगार पक्षाचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. यासंदर्भातील माहिती माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते सुभाष भोईर यांनी ट्वीट करत दिली. यावर ही संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, ‘दिबा पाटील हे फक्त आगरी समाजाचे नेते नव्हते, ते या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे नेते होते. ज्या ठिकाणी कष्टकऱ्यांवर अन्याय व्हायचे त्याठिकाणी मला दिबा पाटील दिसायचे. बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी होते.’, असे म्हटले.

- Advertisement -

बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावरही संजय राऊतांनी निशाणा साधला. ‘आमच्या महाराष्ट्रातही झाडी, हॉटेल आणि डोंगर आहे’, असे म्हटले.

“पळून गेलेल आमदार आसामधील रेडिसन्स ब्लूच्या जेलमध्ये बसले आहेत. बाहेर पडायची हिंमत नाही. इकडे यायची तर अजिबात हिंमत नाही. आता फक्त इथे शिवसेना आहे, शिवसेनेचे आमदार नाहीत, पुढच्या वेळेस नक्की असतील. तसेच, ही सभा झाल्यावर आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे.”, असे राऊत म्हणाले.

“तुम्ही गुवाहटीच्या त्या हॉटेलमध्ये गुलाम आणि कैदी म्हणून राहत आहात. तुम्हाला कोणताही निर्णय घेता येत नाही. तिकडे तुम्ही गुलामी करत आहात. परंतु, अशाप्रकारची गुलामी शिवसेनेनी कधी स्विकारलेली नाही.”, असेही राऊत म्हणाले.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना दोनदा फोन, भाजप श्रेष्ठींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, शिवसेनेचा इन्कार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -