घरमहाराष्ट्रसंभाजीराजेंना पुढे करून महाराष्ट्रात वेगळा डाव खेळण्याचा प्रयत्न; संजय राऊतांना 'संशय'

संभाजीराजेंना पुढे करून महाराष्ट्रात वेगळा डाव खेळण्याचा प्रयत्न; संजय राऊतांना ‘संशय’

Subscribe

संभाजी राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द मोडल्याचा आरोप केला होत. यानंतर आज संभाजी राजेंचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती यांनी त्यावर भाष्य केला. त्यांनी शिवसेनेने शब्द फिरवला म्हणणे चुकीचे आहे, असे म्हणत संभाजीराजेंचे कान टोचले. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

कोल्हापूरच्या मातीत स्पष्ट आणि प्रामाणिकपणा –

- Advertisement -

मी ऐकले त्यांचे पूर्ण निवेदन, यातून एक स्पष्ट झाले की कोल्हापूरच्या मातीत स्पष्ट आणि प्रामाणिकपणा टीकून आहे. शाहू घराण्याने सुद्धा सत्याची कास सोडलेली नाही. शिवसेनेने कधीही कोणाची फसवणूक केली नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवी यांनी जी विधाने केले आहेत. आम्ही ठरवून कोंडी केली, ती आज स्वत: श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या निवेदनातून स्पष्ट झाले आहेत. मी त्यांचे पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो, असे संजय राऊत म्हणाले.

फक्त आमची भूमीका मी स्पष्ट केली –

- Advertisement -

शाहू महाराजांचा अनुभव अधीक दांडगा आहे. छत्रपती शाहू महाराजांना बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत निकटचा स्नेह मिळालेला आहे. त्यामुळे ठाकरे घराने आणि शाहू घराण्याचा संबंध त्यांच्या विधानातून दिसून आला. काही लोकांनी महाराष्ट्रात यानिमीत्ताने पेटवापेटवीची भाषा केली. शिवसेनेला बदनाम करण्याची भाषा केली. शिवसेनेने कधीही खालच्या पताळीवरचे राजकारण केले नाही. फक्त आमची भूमीका मी स्पष्ट केली होती. त्यासाठी मी फक्त प्रस्ताव ठेवला होता.

संभाजीराजेंना पुढे करून वेगळ्या प्रकराचा डाव खेळण्याचा प्रयत्न –

हे स्पष्ट दिसत होते की कोणीतरी संभाजीराजेंना पुढे करून महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचा डाव खेळण्याचा प्रयत्न करत होते. हा डाव नव्हता तर कपट होते. पण ते कपट काय होते. हे आज स्वत: छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केले. म्हणून आजही महाराष्ट्र शाहू महाराजांपुढे झुकतो. त्यांच्या कुटंबापुढे झुकतो. त्याचे कारण हेच आहे. सत्याची कास आणि प्रामाणीकपणा. महाराष्ट्रापुढे जेव्हा जेव्हा संकट आले तव्हा शाहू घराण्याने भूमीका घेतली आहे. मी त्यांना नक्कीच भेटनार आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेणार आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -