घरमहाराष्ट्रसरकारला SIT स्थापन करण्याची खाज, आधी 50 खोक्यांसाठी SIT स्थापन करा; संजय...

सरकारला SIT स्थापन करण्याची खाज, आधी 50 खोक्यांसाठी SIT स्थापन करा; संजय राऊतांची जहरी टीका

Subscribe

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिशा सालियन मृत्यू प्रकरण, रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण, उमेश कोल्हे हत्या प्रकरणामुळे चांगलेच गाजले. या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून ठाकरे गटाला टार्गेत करत या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली. यातील दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी सत्ताधारी पक्षाने स्वीकारली आहे. याच मुद्द्यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सरकारला SIT स्थापन करण्याची खाज, खाजू दे, आधी 50 खोक्यांसाठी SIT स्थापन करा, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राऊत आज माध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले की, केंद्र सरकारने गरीबांना रेशन देण्यासंदर्भात नवीन रेशनची पॉलिसी आज जाहीर केली. त्यापद्धतीने त्यांनी एसआयटीचं रेशनिंग केलं आहे, म्हणजे मागेल त्याला एसआयटी. महाराष्ट्रात सगळ्यात आधी एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे, जे 40 आमदार ज्या पद्धतीने 50 – 50 खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता, त्यावर एक एसआयटी स्थापन झाली पाहिजे. पण जे विषय संपले आहेत, जे विषय पोलिसांनी, सीबीआयने संपवले आहेत त्यावर एसआयटी स्थापन करुन पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. पण आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जाण्यास तयार आहोत. तेच तोंडावर पडतील, अस राऊत म्हणाले.

- Advertisement -

दोन दिवस नागपूरात जाऊन, सत्ताधाऱ्यांची प्रकरण बाहेर काढणार 

सरकार पक्षातल्या अनेकांची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यांचाही आता तपास होईल, आम्ही दोन दिवस नागपूरला जाणार आहे. त्यावेळी अनेक विषय समोर आणू, त्यावरही एसआयटीची मागणी करणार असल्याचे राऊतांनी जाहीर करत या सरकारला एसआयटी स्थापन करण्याची फार खाज आहे, खाजवत बसू दे, अशी जहरी टीका केली आहे.

सरकारने एसआयटी, पोलिसांचे महत्त्वच कमी करुन टाकले

एसआयटी ही अत्यंत महत्वाची आणि अनन्यासाधारण प्रकरणात स्थापन केली जाते. पण या सरकारने एसआयटी आणि पोलिसांचे महत्त्वच कमी करुन टाकले आहे. उटसूट एसआयटी स्थापन करायची, पोलिसांना काही कामचं ठेवायचं नाही, जे विषय संपले ते पुन्हा पुन्हा उकरून काढायचे, आरोपही राऊतांनी केला आहे.

- Advertisement -

विधानसभेत कोणीही उटतो आणि एसआयटीची मागणी करतो. खोटे, दुसऱ्यांवर आरोप करायचे, बदनामी करायची, बदनामीचे शस्त्र वापरायचे. पण आम्ही त्यातून बाहेर पडून हे अग्निदिव्य आहे आणि अशा अनेक अग्निदिव्यातून शिवसेना ताऊन सुलाकून बाहेर पडली आहे आणि तिने पुन्हा पुन्हा महाराष्ट्र प्रकाशमान केला आहे, असही राऊत म्हणाले.


आमदार गोरेंच्या छातीला दुखापत, मात्र प्रकृती स्थिर, रुबी रुग्णालयातील डॉक्टरांची माहिती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -