घरमहाराष्ट्रशिवसेना नेते सुभाष वानखेडेंची खासदार नवनीत राणांवर टीका, म्हणाले...

शिवसेना नेते सुभाष वानखेडेंची खासदार नवनीत राणांवर टीका, म्हणाले…

Subscribe

नांदेड – खासदार नवनीत राणा शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करत आहेत. या टीकेला शिवसेनेच्या महिला नेत्यांकडून प्रत्युत्तरही देण्यात येते. दरम्यान माजी खासदार शुभाष वानखेडे यांनी नवनीत राणा कौर यांच्यावर नांदेडमध्ये टीका केली.

हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी नांदेडमध्ये राणा दाम्पत्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलण्याची नवनीत राणा यांची लायकी नाही. त्या 2019 च्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने निवडून आल्या आहेत, असे ते म्हणाले.

- Advertisement -

पुढे त्यांनी भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या राणा दापत्यांनी भाजपचा जयजयकार करावा. मात्र, शिवसेनेच्या नादाला लागाल तर 2024 च्या निवडणुकीत आम्ही त्यांची जागा दाखवू. कोण नवनीत राणा? महाराष्ट्रामध्ये आलेली बिन बुलाई मेहमान आहे. राणा दापत्यांने उद्धव ठाकरेंविषयी अपशब्द वापरू नयेत, असे वानखेडे यांनी सुनावले आहे.

मेळावा उद्धव ठाकरेच घेणार –

- Advertisement -

येणारा दसरा मेळावा उद्धव ठाकरे हेच घेतील. गेली 50-60 वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे सभा घ्यायचे. आता उद्धव ठाकरेच सभा घेतील, हा माझा ठाम विश्वास आहे, असेही सुभाष वानखेडे यांनी म्हटले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -