घरताज्या घडामोडीनवनीत राणांच्या 'एमआरआय'वर शिवसेनेचे सवाल; लिलावती रुग्णालय प्रशासनाला धरलं धारेवर

नवनीत राणांच्या ‘एमआरआय’वर शिवसेनेचे सवाल; लिलावती रुग्णालय प्रशासनाला धरलं धारेवर

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची लिलावती रुग्णालयात एमआरआय चाचणी करण्यात आली. एमआरआय चाचणीचे राणा यांचे फोटोही व्हायरल झाले. याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे आणि किशोरी पेडणेकर यांनी आज लिलावती रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यापासून त्यांच्यावर वांद्र्याच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. छाती, मान आणि शरीराच्या अन्य भागात वेदना तसेच स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असल्याने शनिवारी त्यांचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. मात्र, नवनीत राणा यांचे एमआरआय स्कॅन करतेवेळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वृत्तसंस्था एएनआयने राणा यांचे एमआरआय करतेवेळीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले. वास्तविक, एमआरआय स्कॅनिंग रुममध्ये रुग्णाशिवाय अन्य कोणाला परवानगी नाही, महत्त्वाचे म्हणजे कॅमेरा, मोबाइल अशा इलेक्ट्रॉनिक उपरकरणांनाही मनाई असते. मात्र तरीही, एमआरआय रुममधील नवनीत राणा यांचे फोटो काढले कोणी? यासह अनेक सवाल उपस्थित करत शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याप्रकरणी आता शिवसेनेच्या नेतमंडळीनी थेट लिलावती रुग्णालय प्रशासनाला रुग्णालयात बसूनच जाब विचारला आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची लिलावती रुग्णालयात एमआरआय चाचणी करण्यात आली. एमआरआय चाचणीचे राणा यांचे फोटोही व्हायरल झाले. याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे आणि किशोरी पेडणेकर यांनी आज लिलावती रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. यावेळी रुग्णालयाच्या प्रशासनाला “नवनीत राणांचा एमआरआय काढताना फोटो कुणी काढले? एमआरआय रुमपर्यंत कॅमेरा पोहोचलास कसा? नवनीत राणांना स्पॉंडिलायटीस असताना इशी का दिली? रुग्णाबरोबर एकालाच राहण्याची परवानगी असताना चार जण कसे होते? एमआरआय काढताना नवनीत राणांचं डोकं उचलताना का दिसत आहे?” असे सवाल किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी विचारले. शिवाय, आम्हाला एमआरआय रिपोर्टची कॉपी द्या, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असं सांगतानाच तुमच्यावर काही दबवा होता का? होता तर तुम्ही पोलिसात तक्रार द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

- Advertisement -

आमदार मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लिलावती रुग्णालयाचे सीईओ आणि संबंधित प्रकरणाच्या स्टाफवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर रेडिओलॉजिस्ट डॉक्टर देशमुख यांनाही धारेवर धरलं. “सीसीटीव्ही कॅमेराचा रिपोर्ट द्या. सर्व स्टाफला बोलवा, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. रेडिओलॉजीच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलवा. नवनीत राणांचा रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही जाणार नाही. कोणतीही व्यक्ती कोणत्याही पदावर असू द्या, तो रुग्णालयात असतो तर तो रुग्ण असतो. आमच्या रुग्णाला स्पॉयंडेलिसिसचा त्रास आहे. एमआरआय रुममध्ये कोणतीही वस्तू नेण्यास मनाई आहे. मग कॅमेरे नेलेच कसे? ही रुग्णालयाची चूक आहे”, असं किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी म्हटलं.

एकीकडे किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे लिलावती रुग्णालयाचे डॉक्टर आणि स्टाफला धारेवर धरत होते तर, दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. एमआरआय रुमधील उपस्थितांना बोलवण्याची मागणी करत त्यांनी एमआरआय खरोखर केला का? असा सवाल उपस्थित केला. त्यावर रुग्णालयाचे सीईओ आणि डॉक्टरांनी हो अस उत्तर दिलं. त्यावेळी राहुल कानाल यांनी या सगळ्याचा पुरावा देण्याची मागणी करत एमआयआर झालंच नाही हे सिद्ध केलं तर? असा सवाल उपस्थित केला.

- Advertisement -

यादरम्यान, लिलावतीचे सीईओंनी “आम्ही सेक्युरीटी ऑफिसरवर कारवाई करू. पेशंट आत गेला. त्यांच्यासोबत स्टाफ जातो. त्यांना किती वेळ लागेल माहीत असतं. त्यावेळी दुर्देवाने दरवाजा उघडा होता. नेहमी दरवाजा बंद असतो”, असं सीईओने सांगितलं. त्यावर किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांनी आक्षेप घेतला. एमआयआर करताना कधीच दरवाजा उघडा ठेवला जात नाही. मग दरवाजा उघडा होता असं कसं म्हणता? असा सवाल त्यांनी केला.

या संपुर्ण प्रकरणी लिलावती रुगणालयाच्या स्टाफला घडलेला प्रकार आणि सत्य घटना सांगण्याची मागणी केली. तसंच, सत्य न सांगितल्यास कारवाईचा इशारा शिवसेना नेत्यांनी दिली. याप्रकरणी आता खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या अन्यायाबाबत केंद्रीतल नेत्यांकडे तक्रार करणार – रवी राणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -