घरमहाराष्ट्रशिवसेनेच्या वचननाम्यात आरोग्यासाठी 'या' सुविधा

शिवसेनेच्या वचननाम्यात आरोग्यासाठी ‘या’ सुविधा

Subscribe

शिवसेनेने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात आरोग्यविषयक गोष्टींवर भर दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांचा वचननामा जाहिर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी शनिवारी शिवसेनेचा वचननामा प्रकाशित केला. या वचननाम्यात एका रूपयात आरोग्य तपासणीचे वचन शिवसेनेने मतदारांना दिले आहे. अनेकदा हॉस्पिटलमध्ये, लॅबमध्ये गेल्यावर रक्ततपासणीसाठी २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात आणि ते अनेकदा सामान्य लोकांना परवडत नाहीत. त्यामुळे, येत्या पाच वर्षात १ रुपयांत आरोग्य तपासणी सेवा उपलब्ध होणार आहे. एका रुपयांत एकूण २०० तपासण्या करुन घेता येणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यात आरोग्यविषयक गोष्टींवर भर दिला आहे.

आरोग्यासाठी वचननाम्यात भर

  • १ रुपयांत २०० आरोग्य चाचण्या करण्यात येणार आहेत आणि हे करताना आर्थिक समतोल ढासळणार नाही याची काळजी घेतली आहे.
  • सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार
  • प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये स्त्रियांच्या कर्करोग चाचणीसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणार
  • दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी ‘रियल टाईम टेलीमेडिसीन’ या प्रणालीचा वापर राज्यभर करणार
  • सरकारी आणि खासगी सहयोगाच्या मार्फत दुर्गम भागात सर्व औषधे आणि उपचार प्रक्रियेसह परिपूर्ण फिरते रुग्णालय ‘मिनी मोबाईल आरोग्य केंद्र’
  • सागरी किनारपट्टीचा विस्तार लक्षात घेवून ‘बोट अॅम्ब्युलन्स’ सेवा उपलब्ध करणार
  • ‘वन रूपी क्लिनिक’: शिव आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य चाचणी सुविधा देण्यासाठी नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा पातळीवर ‘वन रूपी क्लिनिक’ सुरू करणार
  • हजार रुग्णांसाठी एक डॉक्टर या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि औषधांसहित परिपूर्ण करणार

वचननामा प्रसिद्ध करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, ‘राज्याच्या तिजोरीचा विचार करून हा वचननामा बनवण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षांचा फिरण्याचा अनुभव, लोकांशी चर्चा, लोकांचे प्रश्न आणि मागण्या एकत्र करून हा वचननामा बनवण्यात आला आहे. या वचननाम्यात दिलेला प्रत्येक शब्द शिवसेना पूर्ण करेल.’ त्याचबरोबर ‘शिवसेना तेच सांगते जे पूर्ण करु शकते’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -