घरमहाराष्ट्ररायगडच्या आगामी निवडणुकीत सेना स्वबळाचा नारा

रायगडच्या आगामी निवडणुकीत सेना स्वबळाचा नारा

Subscribe

तटकरेंविरोधी उद्योगमंत्र्यांकडे तक्रारींचा पाढा

माजी खासदार आनंत गीते यांनी आघाडीतील घटक पक्षांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर रायगड जिल्ह्यात सेनेने येणार्‍या निवडणुकांमध्ये एकला चलोचा नारा दिला आहे. जिल्ह्यातल्या सेनेच्या आमदारांनी सेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माणगाव दौर्‍यादरम्यान भेट घेऊन त्यांच्याकडे जिल्ह्यात एकला चलोचा आग्रह धरला.

उद्योगमंत्री सुभाष देसाई सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस रायगड दौर्‍यावर होते. या दौर्‍यादरम्यान ते माणगाव येथे सुयश हॉटेलमध्ये उतरले होते. यावेळी सेनेचे रायगडमधील आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, माजी आमदार अनील तटकरे, दक्षीण रायगड जिल्हा प्रमुख अनील नवगणे, बबन पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, माजी प्रमुख किशोर जैन यांनी देसाई यांची भेट घेतली. या भेटीत सेना पदाधिकार्‍यांनी उद्योगमंत्री देसाई यांच्यापुढे गार्‍हाणे मांडताना, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे हे शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना कुठल्याही कार्यक्रमात आमंत्रित करत नाहीत. विकास कामांमध्ये स्थानिक शिवसेना पदाधिकार्‍यांना विश्वासात घेत नाहीत. विकासकामांच्या उदघाटनांमध्ये श्रेयवादाची भूमिका घेत सेनेला डावलतात, अशा तक्रारी या नेत्यांनी उद्योग मंत्र्यांकडे केल्या.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात असूनही रायगडमध्ये तटकरे कुटुंबाकडून सेनेला वारंवार डावलून पक्षाची गळचेपी केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील या राजकीय कुरघोडीत आगामी आगामी स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार व कुठल्याही प्रकारची युती राष्ट्रवादी काँग्रेससोबत नको, अशी गळ या नेत्यांनी देसाईंकडे घातली. या निवडणुका स्वबळावर लढवण्याची शिवसेनेची ताकद असल्याचे या नेत्यांनी सांगितले. सेनेच्या रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बलाबल आणि इतर राजकीय घडामोडींचा अंदाज घेण्यासाठी देसाई माणगावमध्ये थांबले होते. आगामी निवडणुकांमध्ये सेनेच्या ताकदीचाही अंदाज देसाईंना देण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -