घरताज्या घडामोडीगोरेगावमध्ये शिवसेनेचा २१ सप्टेंबरला होणार मेळावा, उद्धव ठाकरेंचे शरसंधान कोणावर?

गोरेगावमध्ये शिवसेनेचा २१ सप्टेंबरला होणार मेळावा, उद्धव ठाकरेंचे शरसंधान कोणावर?

Subscribe

पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरसंधान करणार आहेत. गोरेगावमध्ये शिवसेनेचा 21 सप्टेंबरला होणार मेळावा होणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे हे शरसंधान मुखमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गट, भाजपा की केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यापैकी कोणावर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नेत्यांमधील वादविवाद पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे बंडाळी पुकारत राज्यात भाजपासोबत सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिवसेनेत उभी फुट पडली असून, शिंदे गटातील आणि शिवसेनेचे आमदार एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक सभांना हजेरी लावत सत्तांतराबाबत माहिती दिली. तसेच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आपली बाजू मांडली. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरसंधान करणार आहेत. गोरेगावमध्ये शिवसेनेचा 21 सप्टेंबरला होणार मेळावा होणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे हे शरसंधान मुखमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गट, भाजपा की केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यापैकी कोणावर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. एकमेकांवर शब्दांचा मारा केला जात आहे. त्यानंतर आता शिवसेनेचा मेळावा होणार आहे. 21 सप्टेंबर रोजी गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात शिवसेनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत. दरम्यान, येत्या काळाता आगामी महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्वाचा मानला जात आहे.

- Advertisement -

या मेळाव्यासाठी शिवसैनिक शक्ति प्रदर्शन करत चलो गोरेगाव असा नारा देत या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मुंबईतील शिवसेना नेते, विभागप्रमुख,शिवसेना उपनेते, विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख आदी मुंबईचे सुमारे 30 ते 35 हजार पुरुष व महिला पदाधिकारी यावेळी सहभागी होणार आहे.सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या मुंबईतील 227 शाखां मधून जोरदार तयारी व बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

रविवारी रात्री गोरेगाव पश्चिम एस.व्ही.रोड येथील शिवसेना शाखेत आयोजित केली होती. यावेळी शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार व शिवसेना नेते अरविंद सावंत, माजी मंत्री व विभागप्रमुख अँड. अनिल परब,शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,आमदार,विभागप्रमुख सुनील प्रभू,आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी या सभेची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.

- Advertisement -

या मेळाव्यात आगामी पालिका निवडणुकीची तयारी, शिवसेनेचा दसरा मेळावा, शिवसेनेने सर्व काही देवून सुद्धा आमदारांनी केलेली गद्दारी, शिवसेनेचा न्यायालयात सुरू असलेला लढा, दादरमध्ये शिवसेना व शिंदे गटात झालेला राडा यावर उद्धव ठाकरे हे भाष्य करतील आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेचे जोरदार आसूड ओढतील, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भगवा फडकवण्या साठी सज्ज राहा असे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, गणेशोत्सवात लालबागच्या दर्शनासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी गणपती बाप्पाच्या दर्शनानंतर भारतीय जनता पार्टी आयोजित सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे अमित शाहा यांना उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांची पैठणमध्ये विराट सभा, विरोधकांवर टोलेबाजी आणि आश्वासनांची खैरात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -