घरमहाराष्ट्रShiv Sena : शिवसेना आमदार किरण पावसकरांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप, म्हणाले...

Shiv Sena : शिवसेना आमदार किरण पावसकरांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप, म्हणाले…

Subscribe

मुंबई : निवडणूक आयोग आणि त्यानंतर हा विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंची सेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. परंतु, जेव्हापासून शिवसेनेत फूट पडली आहे. तेव्हापासून शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. या दोन्ही गटांत अनेकदा शाखेच्या जागांवरून देखील वाद झालेले आहेत. परंतु आता शिवसेना (शिंदे गट) आमदार किरण पावसकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी एका मुद्द्यावरून शिवसेनेत राजकारण रंगण्याची आणि मोठा वाद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Shiv Sena MLA Kiran Pavaskar made serious allegations against the Thackeray group)

हेही वाचा… मविआचे रायगडचे उमेदवार अनंत गीतेच! शरद पवार यांचा आग्रह असल्याचा दावा

- Advertisement -

शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्याकडे असून सुद्धा शिवसेनेच्या पॅनकार्ड आणि टॅन कार्डचा ठाकरे गटाकडून गैरवापर सुरू असल्याचा आरोप आमदार किरण पावसकर यांनी केला. त्यामुळे या प्रकरणी किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखालील शिवसेना शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार नोंदविली असल्याची माहिती पावसकर यांच्याकडून देण्यात आली आहे. तर, या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पावसकरांकडून करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष व पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने आम्हाला दिले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार आमच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. पण असे असूनसुद्धा पक्षाच्या अकाउंट संबंधीत काम करताना तसेच आयकर खात्याच्या निर्देशानुसार जे लॉग-इन करावे लागते, त्याचा पासवर्ड लागतो. त्याबाबत गोंधळ सुरू आहे, अशी माहिती पावसकरांकडून देण्यात आली आहे.

याबाबत किरण पावसकर यांनी सांगितले की, शिवसेना पक्षाच्या नावाचा, पक्षाच्या मूळ पॅनकार्ड, टॅन कार्ड तसेच आयकर संबंधित गोष्टींचा उबाठा पक्षाकडून गैरवापर सुरू आहे असा आमचा आरोप आहे आणि यासंदर्भात सखोल चौकशी व्हायला हवी, आणि संबंधितांवर गंभीर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. तसेच याआधी सुद्धा कोणी याचा गैरवापर करून व्यवहार केला असेल, पैसे काढले असतील तर त्याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार किरण पावसकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षाच्या आयकर विभाग संबंधित लॉग-इन, पासवर्डसचा गैरवापर केल्याबद्दल तसेच इतर गंभीर बेकायदेशीर कृत्यांच्या विरोधात लेखी तक्रार शिवसेना पक्षाचे आमदार व शिवसेना सचिव किरण पावसकर, संजय मोरे, सिद्धेश कदम, भाऊ चौधरी तसेच शिवसेना पक्षाचे खजिनदार आमदार डॉ. बालाजी किणीकर या शिष्टमंडळाने याबाबतची लेखी तक्रार मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात केली आहे.

- Advertisement -

तर, म्ही आमच्यासाठी पैसे घेतले नाहीत. आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्वीपासूनचे वाक्य होते, आम्हाला त्यांची प्रॉपर्टी व पैसे नकोत. आम्हाला फक्त बाळासाहेबांचे नाव व शिवसेनेचे आमदार-खासदार जे आमच्याकडे आलेले आहेत. त्यांची फक्त काळजी घ्यायची आहे. पण आता नियमानुसार आयकर व टीडीएस भरण्यासाठी आम्हाला तांत्रिक गोष्टी हव्या आहेत. पण त्यातच जर घोटाळा होत असेल, तर त्याची चौकशी व्हायलाच हवी आणि यासाठीच आम्ही आज मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून त्यांच्याजवळ यांसंबंधी लेखी तक्रार केली. मुंबई पोलीस आयुक्तांनी सुद्धा आम्हाला या संदर्भात सर्व स्तरावर सखोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच सत्य समोर येईल, असा आम्हाला विश्वास आहे, असेही पावसकरांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -