‘शिवाजी पार्कातला दसरा मेळावा, बीकेसीतला तर इव्हेंट’; सचिन अहिरांचा शिंदेंना टोला

शिवसेनेच्या इसिहासात प्रथमच दोन दसरा मेळावे झाले. दादरच्या शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा झाला. तसेच, वांद्रे कुर्ला संकुलन (बीकेसी) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा झाला. मात्र या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांशी बातचीत केली असता, त्यांनी शिवाजी पार्कातील दसरा मेळावा हाच खरा शिवसेनेचा दसरा मेळावा असे म्हटले.

शिवसेनेच्या इसिहासात प्रथमच दोन दसरा मेळावे झाले. दादरच्या शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा झाला. तसेच, वांद्रे कुर्ला संकुलन (बीकेसी) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा झाला. मात्र या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांशी बातचीत केली असता, त्यांनी शिवाजी पार्कातील दसरा मेळावा हाच खरा शिवसेनेचा दसरा मेळावा असे म्हटले. शिवाय, शिवसेना आमगदार सचिन अहिर यांनी बीकेसीमधील दसरा मेळाव्याला इव्हेंट म्हणत, मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

दसरा मेळावा संपल्यानंतर शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी माय महानगर या वृत्तसंस्थेशी बातचीत केली. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना “शिवाजी पार्कातला दसरा मेळावा, बीकेसीतला तर इव्हेंट”, असे म्हटले.

याशिवाय, “तुमची साथ असेल तर, मी मुख्यमंत्री निवडून आणेनच, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे आमदार सचिन अहिर यांनी सांगितले.

शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना मी भारावून गेलो असल्याचे म्हटले. हे स्वत:हून आलेले शिवसैनिक आहेत, भाड्याने आणलेला एकही नाही”, असेही त्यांनी म्हटले. याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी टीका केली.

“वाईट इतकच मी रूग्णालयात असतांना ज्यांना जबाबदारी दिली ते कटाप्पा ते कट करत होते. त्यांना कल्पना नाही हा उद्धव ठाकरे नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. देव तुमचं भल करो हा तेजाचा शाप. ज्यांना सगळं दिलं ते नाराज झाले. ज्यांना काही दिलं नाही ते माझ्यासोबत. बाळासाहेब म्हणायचे शिवसेना एकट्यादुकट्याची नाही, शिवसैनिकांची आहे. तुम्ही ठरवाल मी राहायचं की नाही. हे गद्दारांनी नाही तुम्ही सांगायचं. बाप मंत्री, कार्ट खासदार, सगळं माझ्याचकडे पाहिजे. का केली महाविकासाघाडी? अतिशय स्पष्ट आहे. भाजपने पाठीत वार केला म्हणून. तुम्ही सांगा जे केले ते योग्य होतं का? मी हिंदुत्व सोडले का? सात लोकांत तेही होते मंत्रिपद घेतांना तेव्हा का बोलला नाही. आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष ठरले होते. मग आज जे घडले ते तेव्हाच का नाही केल. शिवसेना संपवायची. हाव ती किती त्याला शिवसेनाप्रमुख व्हायचा तुम्ही स्वीकारणार स्वतःच्या वडिलांच्या नावाने मत मिळत नाही. बाप चोरणारी अवलाद. आनंद दिघे वीस वर्ष झाली ते जाऊन आजवर आठवले नाही. एकनिष्ठ होते.”, असा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर टीका केली.


हेही वाचा – कटप्पा, गद्दार, बाप आणि हिंदुत्त्व; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ‘हे’ दहा मुद्दे वाचाच!