घरमहाराष्ट्रमद्यधुंद अवस्थेत हायवेवर डान्स, शिवसेना आमदाराने पोलिसाच्या कानाखाली काढला जाळ

मद्यधुंद अवस्थेत हायवेवर डान्स, शिवसेना आमदाराने पोलिसाच्या कानाखाली काढला जाळ

Subscribe

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथे मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावली. बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर काहीजण पोलिसांची पाटी लावलेली कार रस्त्यावर उभी करुन रस्त्यातच नाचत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात भेटून आमदार संजय गायकवाड परत येत होते. यावेळी देऊळगाव महीजवळ असलेल्या सरंबा फाट्याजवळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ट्राफिक जाममधून पुढे जाऊन पाहिले असता रस्त्याच्या मधोमध ‘पोलीस’ अशी पाटी असलेली MH28 AN 3641 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारसमोर काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत नाचत होते. संजय गायकवाड यांनी हा प्रकार पाहिला. गायकवाड यांनी पोलिसांना चांगलच धारेवर धरलं. एवढच नव्हे तर गायकवाड यांनी एका पोलिसाच्या कानाशिलात देखील लगावली.

- Advertisement -

त्यानंतर, ‘पोलीस’ लिहिलेली पाटी असलेल्या कारमध्ये बसून मद्यधुंद असलेल्या पोलिसांनी तिथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार देऊळगाव महीजवळ असलेल्या सरंबा फाट्यावर रविवारी सायंकाळी घडला असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

दरम्यान, या घटनेवर पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घडलेला प्रकार हा पोलीस खात्याला अशोभनीय असल्याचं म्हणत जे अधिकारी यात दोषी आहेत त्यांचा डिफॉल्ट रिपोर्ट मागविला असून तात्काळ त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -