घरमहाराष्ट्रशिंदे गटाचे 13 खासदार पुन्हा लोकसभेच्या मैदानात?

शिंदे गटाचे 13 खासदार पुन्हा लोकसभेच्या मैदानात?

Subscribe

लोकसभा निवडणुका (Loksabha Election) काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. यासाठी सर्वच पक्षाचे नेते जोरदार तयारीला लागेल आहेत. लोकसभा निवडणुकींच्या तयारीला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या नेत्यांना, कार्यंकर्त्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 13 खासदार पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरणार अशी माहिती समोर येत आली आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही महायुतीतला घटकपक्ष म्हणून तयारीला लागला आहे. यावर शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे म्हणाले की, आमचे विद्यमान 13 खासदार लोकसभेची निवडणूक लढणार, आणि  याची तयारी देखील सुरू केली आहे. निवडणूकीच्या दृष्टीने खासदार आपापल्या मतदारसंघात काम करत आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विद्यमान खासदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिलेले आहेत.

- Advertisement -

माझ्या मतदारसंघातील 58 सर्कलमध्ये 58 मेडिकल कॅम्प घेण्यात येणार असून फेब्रुवारीमध्ये 58 मेडिलकल कॅम्प पूर्ण करणार आहोत. रोजगार मेळावे अयोजित करत आहोत. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचे नियोजन आम्ही करत आहोत. मी पाच वर्ष मुंबई-दिल्लीत फार कमी असतो, कारण मला माझ्या मतदारसंघात राहयाला आवडतं. मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. असं लोकसभेच्या जागावाटपावर बोलताना कृपाल तुमाणे म्हणाले.

13 खासदारांपैकी काही चेहरे बदलण्यात येणार आहेत. पक्षाच्या चिन्हाबाबत काही ॲडजेस्टमेंट होणार आहे, अशी चर्चा होती, यावर तुमाणे म्हणाले, “हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा विषय आहे. मात्र आम्ही 13 विद्यमान खासदार पुन्हा लढणार यात शंका नाही,” अशीही तुमाणे म्हणाले.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -