घरताज्या घडामोडीCorona : कोरोनाबाधित हेमंत गोडसे तीन दिवसांपूर्वीच गडकरींना भेटले होते

Corona : कोरोनाबाधित हेमंत गोडसे तीन दिवसांपूर्वीच गडकरींना भेटले होते

Subscribe

नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे गेल्या तीन दिवसांपूर्वीच दिल्लीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटले होते.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. याचा विळखा आता राजकीय नेत्यांना देखील होऊ लागला आहे. कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असताना आता नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाइन केले आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन हेमंत गोडसे यांनी केले आहे.

तर, गोडसे गेल्या तीन दिवसांपूर्वीच दिल्लीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना भेटले होते. नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत त्यांनी गडकरींशी चर्चा केली होती. दरम्यान, गडकरींसह ते इतर अधिकाऱ्यांनाही भेटले होते. त्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

ट्विट करुन दिली माहिती

खासदार हेमंत गोडसे यांना दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी केली होती. दरम्यान, सोमवारी रात्री त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गोडसे यांनी ट्विटरवरूनही त्याची माहिती दिली आहे. ‘माझ्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी आणि सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकीय सल्ल्याने गरज असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी. मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरू ठेवेन आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन’, असे गोडसे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गोडसे यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाइन करून घेतले आहे.

- Advertisement -

तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील सोमवारी (AIIMS) हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शहा यांची प्रकृती उत्तम असून त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल, असे रविवारी एम्सकडून सांगण्यात आले होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी हलका ताप आल्याने अमित शहा यांना पुन्हा दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज १२ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नाशिकची आकडेवारी

नाशिक शहरातील १८ लाख ८७ हजार ३७८ लोकसंख्येपैकी आतापर्यंत १२ लाख २६ हजार ८७२ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात एकूण ३३ हजार ७८५ जण कोमॉर्बिड अर्थात विविध व्याधींनी ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. उर्वरित लोकांचेही सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोमॉर्बीड सर्वेक्षणाची गती कमी झाल्यामुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली असून सर्वेक्षणाची गती वाढविण्याचे निर्देश आरोग्य-वैद्यकीय विभागाला देण्यात आले आहेत.


हेही वाचा – न ढोलताशे, न मिरवणूक… साधेपणाने होणार ‘बाप्पा’चे विसर्जन!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -