नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणा; प्रियंका चतुर्वेदींचे पंतप्रधान मोदींना पत्र

Shiv sena mp priyanka chaturvedi wrote a letter to pm modi for Netaji's ashes back home

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणा या मागणीसाठी शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले विनंती केली आहे. नेताजींच्या मुलीनेही हीच मागणी केली होती. प्रियंका प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी केली आहे. प्रियंका यांनी पत्रात लिहिले आहे की, आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करत आहोत. नेताजींच्या अस्थी भारतात आल्या तर ती त्यांच्या बलिदानाला आणि देशासाठीच्या समर्पणाला खरी श्रद्धांजली ठरेल. त्यामुळेच नेताजींची कन्या अनिता बोस फाफ यांच्या समर्थनार्थ ही मागणी करत आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी हे पत्र 16 ऑगस्टला लिहिले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या प्रा. अनिता बोस फाफ यांनीही अलीकडेच सरकारला आवाहन केले होते की, जपानमध्ये असलेले नेताजींच्या अस्थी भारतात आणून त्यांची डीएनए चाचणी करण्यात यावी. आपल्या मार्मिक आवाहनात त्यांनी असेही म्हटले की, नेताजींच्या अस्थी जपानमधील एका मंदिरात जतन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हे सर्वात मोठे रहस्य आहे. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाल्याचे सांगण्यात आले. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना हे सत्य मानत नाही. त्यामुळेच नेताजींच्या अस्थी भारतात आणण्याची मागणी सातत्याने होत आहे.


महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दाढीवाले मुख्यमंत्री; भुजबळांचा दाढीवरून पंतप्रधान मोदींना टोला