घरताज्या घडामोडीसंजय राऊतांविरोधात भाजप आक्रमक; प्रसाद लाड उपोषण करणार

संजय राऊतांविरोधात भाजप आक्रमक; प्रसाद लाड उपोषण करणार

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. राऊत यांनी भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा पुरावा मागितला असल्यामुळे भाजप निषेध करणार आहे. यामुळे साताऱ्याचे रहिवाशी देखील संतापले आहेत. तसंच आमदार राम कदम देखील पोलिसात तक्रार करणार आहेत. याशिवाय आमदार प्रसाद लाड देखील सायन पोलिस स्टेशन बाहेर उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे सध्या उदयनराजे यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

राऊतांच्या या वक्तव्यावर टीका करत आमदार प्रसाद लाड असं म्हणाले की, ‘संजय राऊत त्यांचं आडनाव बदलून खान करणार असावेत. छत्रपतींच्या विरोधात बोलणारी ही मुघलांची औलाद आहे. छत्रपतींवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेम केलं, शिवसेना छत्रपतींच्या आशीर्वादाने बनवली. त्याचं पक्षाचे खासदार छत्रपतींच्या वंशजांचे पुरावे मागतात. याचाच अर्थ सत्तेसाठी लाचार असलेली मुघलांची औलाद आहेत.’

- Advertisement -

शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केल्यामुळे साताऱ्यातील पोवई नाका परिसरात निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे. तसंच उदयनराजे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात राजवाडा येथे गांधी मैदानावर जमणार आहेत.

नक्की काय घडलं?

‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर बोलताना भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. यादरम्यान त्यांनी ‘शिवसेना नावं दिलं तेव्हा वंशजांना विचार होत का? असा सवाल यावेळी केला होता. याचाचं उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ‘शिवसेना नावं दिलं तेव्हा वंशजांना विचार होत का? असा प्रश्न करत आहे. मात्र त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत. या विश्वाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जेव्हा आम्ही गणपतीची पूजा करतो तेव्हा आम्ही गणपतीला तुझी पुजा करू का म्हणून विचारायला जात नाही.’

- Advertisement -

हेही वाचा – मी दाऊदला दमही दिला आहे – राऊत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -