हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा; राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण

chandrakant patil reaction on sanjay raut statement over bjp leader eye checkup
माझी दृष्टी तपासण्यासाठी नेतृत्व आणि संघ समर्थ, चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक वाग्युद्ध अद्याप सुरूच आहे. वाघाशी मैत्री करायला तयार आहोत वरून सुरू झालेली शाब्दिक चकमक पिंजऱ्यातल्या वाघापर्यंत येऊन पोहोचली आहे. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पिंजऱ्यातल्या वाघ म्हटलं. यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो. तसंच हे आमंत्रण देत असताना हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

संजय राऊत नंदुरबार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. “चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा,” असं आव्हान संजय राऊत यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांना दिलं.

पवार-प्रशांत किशोर भेटीकडे लक्ष देण्याची गरज नाही

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर बैठक सुरू आहे. या भेटीवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. एखादा सर्व्हे करण्यासाठी किंवा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांना भेटले असतील. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असं राऊत म्हणाले.