शिवसेना, महाविकास आघाडी 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेणार, भुंकायचे तेवढं भुंका; राऊतांचा विरोधकांना इशारा

Sanjay Raut targets pm modi said center agency Separate syndicate started with BJP leaders

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांनी पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. याच आरोपांवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता शिवसेनेची शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार त्याआधी ज्या फाईल ज्यांना दाखवायच्या आहेत त्यांना दाखवा. ही माझी नाही तर पक्षाची पत्रकार परिषद असेल. शिवसेनेची असेल. त्याआधी महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद होईल, मी घाबरत नाही, जे काम केले आहे, देशाने नाही पूर्ण जगाने पाहिले आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

“कुणी भूंकत असते, तर भुंकू द्या त्यांना सवय असते”

“मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल हायकोर्ट आणि संपूर्ण जगात वाहवाह झाली त्याबद्दल अनेकांच्या मनात दु:ख आहे, पुण्यातील कोरोना केंद्र मुंबईतील कोव्हिड केंद्र… आमच्या इथे गंगेत मृतदेह वाहत नव्हते. भाजपवाल्यांना गुन्हे दाखलचं करायचे आहेत तर युपी, वाराणसी, काशीमध्ये जाऊन करा. तिथे हजारो मृतदेह वाहून गेले… गुजरातमध्ये दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी ज्या रांगा लागल्या होत्या त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, त्या सरकारने केलेल्या घोटाळ्यांची चौकशीची मागणी केंद्र तपास यंत्रणांकडून करा. महाराष्ट्रात जे झाले ते देशाने पाहिले. कोणी जर भुंकत असले तर त्याकडे महाराष्ट्रातील जनता लक्ष देणार नाही. कोणाताही घोटाळा झालेला नाही हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. कुणी भूंकत असते, तर भुंकू द्या त्यांना सवय असते.” अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

“फाईली घेऊन फिरणाऱ्यांच्या फाईल तयार आहेत”

“मुंबई, नाशिक, पुण्यातील कोव्हिड सेंटर सर्वच कोव्हिड सेंटरसाठी  त्याकाळी सरकारसोबत काही सामाजिक लोकं होती. कोव्हिड हा असा आजार आहे ज्यामुळे लोकं जवळ जायला घाबरतं होते. अशावेळी काही संस्था पुढे आल्या आणि त्यांनी कोव्हिड सेंटर चालवली. भाजपची लोकं नव्हती. पुढे येते नव्हते, घाबरून बसले होते नंतर आले पण आमची लोकं होती. आणि आता त्यांच्यावर घाणेरडे आरोप करतायत. राजकारण नंतर समाजकारण आधी, भाजपाला आरोपचं करायचे आहेत तर उत्तरप्रदेशमध्ये जा गंगेत हजारो प्रेत वाहत जात होती फेकून दिली होती, उपचार होत नव्हते, त्यांवर गुन्हे दाखल करा. जे इथे फाईली घेऊन फिरतायत त्यांचीही फाईली तयार आहेत. तेव्हा कळेल फाईल काय असते. आम्ही तुम्हाला घाबरतं नाही, ” असंही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात १० मार्चनंतर राजकीय भूकंप ठाकरे सरकार कोसळणार असं विधान विरोधी पक्ष नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते. याच विधानावर आता शिवसेनेने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. “चंद्रकात पाटील तारखा देत राहतील, त्याबद्दल मला वाईट वाटत नाही. दोन वर्षात त्यांच्यावर आलेला प्रसंग मी समजून घेऊ शकतो. दादांविषयी मला पूर्ण सहानभूती आहे, दादा असतील किंवा त्यांचा पक्ष असले, चंद्रकात पाटील हे फार निष्पाप, स्वच्छ ह्रदयाचे, निर्मल मनाचे असे नेते आहेत. त्यांची वेदना आहे ती,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

“प्रयत्न करता आत्ता येईल सरकार, उद्या येईल, पडेल, आत्ता पडेल, उद्या पडेल पण पडत नाही त्यातून मग नैराश्य येतं. मग पुढची तारीख दिली जाते. आता 10 मार्चनंतर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल येईल, त्यानंतर ते सरकार पडेल. याआधी पश्चिम बंगालच्या विधानसभा होत्या त्यानंतर पडणार होते. विविध माध्यमातून त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरु ठेवले पाहिजे. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सच्या माध्यमातून कारण त्यांकडे दुसरं आता काही नाही. त्यामुळे भाजपाला पुन्हा पुन्हा शुभेच्छा आणि चंद्रकांत दादांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत ते त्यांचे इतर जे काही हत्यारं आहेत ते पूर्ण करतील. जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका” असा हल्लाबोल शिवसेना संजय राऊत यांनी केला आहे.

“लोकसभा निवडणुकी येतील तेव्हा सरकार पडेल, आम्हाला पाडता पाडता स्वत: पडले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सरकार पाडू इच्छित आहेत तर पाडू द्या. पाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत स्वत: पडतील पण आम्ही पडणार नाही.उत्तर प्रदेशमध्ये खिचडी पकत नाही उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव आघाडीवर आहेत, गोव्यात खिचडी आहे पण लोकं कोणाला मतदान करता हे पाहावे लागेल. गोव्यात काँग्रेस पुढे आहे या क्षणी, पण टक्कर आहे. देवेंद्र फडणवीस ठाण मांडून बसले आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्राचे नेते आहेत पण जमिनीवरचे चित्र फार वेगळे आहे. भष्ट्राचारी, माफिया, अमली पदार्थांचे व्यापारी अशा लोकांच्या हातात गोव्याचे राजकारण आहे. हे देवेंद्र फडणवीसांना चांगले माहित मी कोणाबद्दल बोलतोय,” असही राऊत म्हणाले.


Uttarakhand Election 2022 : उत्तराखंड निवडणुकीतील मोठे चेहरे, समीकरण आणि जागांसाठीची लढत


 

.