उद्धव ठाकरे शिंदे गटाला राजकारणातून उठवणार, संजय राऊतांचा इशारा

shiv sena mp eknath shinde critisizes bjp modi govt and shinde group

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे गटाला राजकारणातून उठवणार असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गट आणि भाजपवर देखील गंभीर आरोप केले आहेत. ते आज सकाळी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

दिल्लीश्वरांना बाळासाहेब ठाकरेचीं शिवसेना संपवायची

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की,  शिवसेना संघटनेवरती फुटीरांना खरी शिवसेना कोणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी यासारख महाराष्ट्राच दुर्दैव नाही. खरं म्हणजे आपण फुटलेले आहात, फुटीर आहात. आपण एक वेगळा गट स्थापन केला आहात, आपल्या नवीन संसारात सुखाने रहा. पण ज्या दिल्लीश्वरांना बाळासाहेब ठाकरेचीं शिवसेना संपवायची आहे त्यांच हत्यार म्हणून महाराष्ट्र, मराठी माणसाच्या विरोधात हे वापरले जात आहेत.  असही राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा माफ करणार नाही

बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर ज्यांनी दिल्ल्या आदेशाने, महाराष्ट्र द्वेष्टांच्या आदेशाने ही वेळ आणली आहे. मला असं वाटत वरून बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा पाहतोय, तो तुम्हाला माफ करणार नाही, या मातीत तुम्ही मरणार… आज तुम्ही घोड्यावर बसलात उद्या लोकं तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही. माझ्या शब्दांची नोंद करून ठेवा. अशा शब्दात राऊतांनी बंडखोर शिवसेना नेत्यावर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात नाही, एक महिना होत आला तरी सरकारचं अस्तित्व दिसत नाही. दोघांच मंत्री मंडळ आहे, याला काय म्हणावं. सरकार बनवण्यासाठी अजूनही चाचपडत आहेत आणि मोठे निर्णय घेत आहेत. जे निर्णय बेकायदेशीर आणि असंविधानिक आहेत. असही राऊत म्हणाले.

शिंदे गटाला या राज्याची जनता उठवणार

ही आमची बंडखोरी नाहीत हा आमचा उठाव आहे, शिंदे गटाकडून म्हटले जात आहे. ज्यावर राऊत म्हणाले की, तिरडी उठते. राजकीय जनाजा.. असं म्हणतोय मी नाही तर परत म्हणतील आमचे मुदडे आले परत वैगरे वैगरे… नाही… तुम्हाला या राज्याची जनता उठवणार आहे. महाराष्ट्रातील जनतेचा जो प्रतिसाद मिळतोय तो पैसे आणि खोके देऊन मिळत नाहीय. असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.