घरताज्या घडामोडीभाजपातील त्या नेत्यांसाठी होते मुख्यमंत्र्यांचे संकेत - संजय राऊत

भाजपातील त्या नेत्यांसाठी होते मुख्यमंत्र्यांचे संकेत – संजय राऊत

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, शुक्रवारी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, असा उल्लेख केला होता. यावेळेस व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचा या विधानावरून भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या कालच्या विधानानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘भाजपातील अनेक जण शिवसेनेत येऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे संकेत होते,’ असे संजय राऊत म्हणाले.

नक्की काय म्हणाले संजय राऊत? 

‘तुम्ही आमचे भावी सहकारी आहात. हा छोटासा मुद्दा आहे. मुख्यमंत्र्यांची भाषण करण्याची एक वेगळी स्टाईल आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाकरे स्टाईलमध्ये भाषणं केलं. जर कालच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे कोणाला खूप आनंद झाला असेल. त्याच आनंदात त्यांना तीन वर्ष राहू द्यात. सरकारला आता कोणताही धोका नाही. शिवसेना शब्दाची पक्की आहे. शिवसेना विश्वासघात करत नाही, पाठीत खंजीर खूपसत नाही, दिलेला शब्द मोडत नाही. शिवसेनेची ही खासियत आहे, खासकरून ठाकरे कुटुंबाची आणि आम्ही सगळे त्याच मार्गाने जातो. सरकार पडेल, नवीन गटबंधन होईल या भ्रमात कोणी राहू नये. मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून लोकांनी खूप पतंग उठवले. पण तो पतंग कधी कापायचा हे आम्हाला माहित आहे,’ असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

पुढे राऊत म्हणाले की, ‘आता सरकारमध्ये काहीही होणार नाही आणि कोणी होऊ देणार नाही. भाजपमध्ये असे काही नेते आहेत, जे उघडपणे बोललेत शिवसेना भवनमध्ये जाऊन तोडफोड करू. काही केंद्रीय मंत्री असे आहेत. जे मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याबाबत बोलतात. अशा विचारधारेचा जो पक्ष आहे, जो शिवसेनेला शत्रू मानतो त्यांच्यासोबत कसे काय गटबंधन होऊ शकते. गटबंधन आम्ही तोडले नाही, त्यांनी तोडले. आता आमची व्यवस्था सुरळीत सुरू आहे. महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे आणि आम्ही पुढेच घेऊन जाऊ. त्यामुळे जे काही मंचावर बोलण्यात आलं, ते बोलणं मंचावरचं संपलं.’


हेही वाचा – आजी, माजी, भावी…मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर तर्क-वितर्कांना उधाण

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -