घरमहाराष्ट्रतुम्हाला येणाऱ्या शिव्या भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते, मंत्र्यांना देऊन दाखवा; राऊतांचे संजय गायकवाडांना...

तुम्हाला येणाऱ्या शिव्या भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते, मंत्र्यांना देऊन दाखवा; राऊतांचे संजय गायकवाडांना आव्हान

Subscribe

शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युतर देताना गलिच्छ भाषेत शिवागाळ केली. याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर आता ठाकरे गटातील नेत्यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात खुद्द संजय राऊत यांनीच यावर पुन्हा पटलवार केला आहे. संजय गायकवाड यांना जर एवढ्या शिव्या देता येत असतील तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाके भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रवक्ते आणि मंत्र्यांना शिव्या देऊन दाखवा असे थेट आव्हानच राऊतांनी संजय गायकवाडांना दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, मला कोणी गद्दार शिव्या दिल्या तर तो मी माझा सन्मान समजतो, कारण ते गद्दार आहे. संजय गायकवाडांना उत्तम शिव्या जर देता येत असतील तर त्यांनी सगळ्यात आधी या शिव्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते, मंत्री यांना द्याव्यात. त्यांना शिवा देणाऱ्यांवर आम्ही फुल उधळू, त्यांनी शिव्या आम्ही त्यांना संधी देत आहोत. असा टोला राऊतांनी लगावला आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करतो, सावित्रीबाई फुले यांचा अपमान सहन करतो, उत्तम शिव्या येतात ना तर शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आईवरून, बहिणीवरून द्या ना शिव्या. महाराष्ट्र तुमच्या शिव्यांचं कौतुक करेल. अशी संतप्त प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

महाराष्ट्रात शिवप्रेमाच्या ढोंगाची लाट आली आहे. पंतप्रधान मोदींना रावण महटल्यावर यांच्या अस्मिता जाग्या होतात. पण जिथे महाराष्ट्राचा, शिवरायांचा अपमान होतो तिथे तुमच्या अस्मिता थंड पडते. तिथे तुमचा नाग फणा काढत नाही. अशी टीकाही राऊतांनी केली आहे.


साई रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्यांकडून चुकीची माहिती; पर्यावरण अधिकाऱ्यांचा खुलासा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -