भाजपने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला

राज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी भाजप आणि मनसेवर निशाणा साधला. राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी केला गेला आहे. त्यांचे भोंगे त्यांच्यावरच उलटत आहेत. निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.

the strict Action will be taken on poharadevi crowd case

मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात भाजपने राज ठाकरेंचा बळी घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खांद्यावर बंदुका ठेवून भाजपने महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटला असून हिंदुत्वासाठी आणि श्रद्धाळूंसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.

राज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी भाजप आणि मनसेवर निशाणा साधला. राज ठाकरेंचा वापर राजकारणासाठी केला गेला आहे. त्यांचे भोंगे त्यांच्यावरच उलटत आहेत. निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच राज ठाकरेंचा भोंग्यांचा विषय हा सामाजिक नाही, तर धार्मिकच असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

भोंग्यांबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सन २००५चा आहे. भाजपने मनसेसारख्या पक्षाला पुढे करून हा विषय चर्चेत आणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण जो गुप्तचर खात्याचा किंवा इतर विभागाचा अहवाल आला आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थाने, श्रद्धास्थाने आहेत त्यामध्ये शिर्डी, त्र्यंबकेश्वर यांसह अनेक देवस्थानांवर सकाळच्या काकड आरत्या होतात. काकड आरतीला मंदिरात खूप कमी लोकांना प्रवेश असतो. या काकड आरतीचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील लोक जागे असतात किंवा आसपास उभे असतात, मात्र आज भोंग्यांचा विषय निर्माण झाल्यामुळे या संपूर्ण देवस्थानावर लाऊडस्पीकर लागले नाहीत आणि लाखो हिंदू भाविकांची गैरसोय झाली. त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही. म्हणजे मशिदींवरील भोंग्यांचे निमित्त करून भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदूंचाही गळा घोटला, अशी टीका राऊत यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाच्या जुन्या कॅसेट जो पाठवतो त्यांनी बाळासाहेब समजवून घ्यावे, असा टोला लगावताना राऊत म्हणाले की, ज्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी आम्हाला बाळासाहेब शिकवण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे प्राचीन ट्विट जरी टाकले तरी त्यांनी आम्हाला बाळासाहेब समजावू नये. आजही आमचा श्वास बाळासाहेबांच्या विचारांनी चालतो. बाळासाहेबांनी भोंगे, नमाज याबाबत भूमिका घेतली. सत्ता आल्यावर रस्त्यावरील नमाज त्यांनी बंद केले. बाळासाहेबांनी रस्त्यावरील नमाजावर तोडगा काढला. भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आणि भोंगे बंद झाले, असेही राऊत म्हणाले.