घरट्रेंडिंगउद्या बाळासाहेबांना आम्हीच शिवसेनेत आणल्याचा दावाही करतील; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

उद्या बाळासाहेबांना आम्हीच शिवसेनेत आणल्याचा दावाही करतील; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

Subscribe

'शिवसेनाप्रुमख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आमचाच आहे. तसेच बाळासाहेबांना आम्हीच पक्षात आणलंय, असेही ते आता सांगायला कमी करणार नाहीत', असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला लगावला आहे.

‘शिवसेनाप्रुमख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आमचाच आहे. तसेच बाळासाहेबांना आम्हीच पक्षात आणलंय, असेही ते आता सांगायला कमी करणार नाहीत’, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला लगावला आहे. या गटाला शिवसेना भवनाचा ताबा पाहिजे. मातोश्रीचा ताबा पाहिजे. सामनाचा ताबा पाहिजे, अशीही खोचक शब्दांत टीका संजय राऊतांनी केली. (Shiv sena mp sanjay raut slams cm eknath shinde and rebel mla)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “फुटीर गट चंद्रावरही कार्यालय स्थापन करतील, एवढ्या हवेत आहेत. या गटाला शिवसेना भवनाचा ताबा पाहिजे. मातोश्रीचा ताबा पाहिजे. सामनाचा ताबा पाहिजे. अशातऱ्हेने ते एकदिवशी जो बायडनचे घरही ताब्यात घेतली. कारण एवढा मोठा पक्ष आहे. त्यांच्या की बाळासाहेब ठाकरेंचा मुळ पक्ष हा आमचाच आहे, किंबहूना बाळासाहेब ठाकरे यांना आम्हीच पक्षात आणलंय, असेही ते आता सांगायला कमी करणार नाहीत. शिवाय उद्धव ठाकरे यांना आम्हीच पक्षप्रमुख केले असंही म्हणतील”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

- Advertisement -

“या महाराष्ट्रात आणि देशात आता कधीही काहीही होऊ शकते. कारण ज्याप्रकारची लोकशाहीचे चित्र दिसतेय. त्यावरून तुम्ही काही विचार करू शकत नाही. जी काय लढाई लढायची आहे ती लढूद्या. काल जो काय १२ खासदारांचा गट (फुटीर गट) भाजपाच्या प्रेरणेने आम्हाला सोडून गेला. ते कालपर्यंत आमचे सहकारी होते. आमचे मित्र होते. आजही त्यांना मी आमचे मित्र आणि सहकारी मानतो. कोणत्या मजबुरूनी त्यांना आम्हाला सोडले हे माहितीये. यामागे राजकारणाचे कारण अजिबात नाही, हे त्यांनाही माहित आहे. प्रत्येकाची वेगळी मजबुरी आणि कारणे आहेत. बाकी हिंदुत्व आणि युती तोंडी लावायला आहे”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.


हेही वाचा – रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले.., नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -