‘ते’ तीन निर्णय फिरवले असतील तर, हे सरकार हिंदुत्वद्रोही; संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले. उस्मानाबादचे धाराशिव केले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईला लोकनेते दी. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पण हे तिन्हीही निर्णय रद्द किंवा स्थगित केले असतील तर, हे सरकार हिंदूत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे.

sanjay raut

‘पाच निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतले होते, त्याला स्थगिती किंवा रद्द केल्याचे मला काल समजले. नुकताच माझी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. या निर्णयांमध्ये महत्वाचे म्हणजे ठाकरे सरकारकारने विशेषत: उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले. उस्मानाबादचे धाराशिव केले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईला लोकनेते दी. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. पण हे तिन्हीही निर्णय रद्द किंवा स्थगित केले असतील तर, हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे’, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केली. (shiv sena mp sanjay raut slams eknath shinde government)

शिवसेना खासदार संजय राऊत आज नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यापूर्वी राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी राज्यातील नव्या शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. “औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर कधी करणार, असा सवाल गेल्या काही दिवसांपासून भाजपा विचारत होती. उस्मानाबादचे नामांतर धाराशिवसाठीही त्यांची हीच भुमिका होती. शिवाय, नवीमुंबई विमानतळाला दी. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मोर्चे काढण्यात आले होते. भाजपाच आंदोलन करत होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारची पर्वा न करता औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्णयला फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने स्थगिती दिली असले, तर यांच्यासारखे डोंगी लोक कोणीही नाहीत” असे राऊत म्हणाले.

मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे.”, असेही संजय राऊत म्हणाले.

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर बंड

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर बंड पुकारला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बहुमताच्या चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता. मात्र, या राजीनाम्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारची अखेरची मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याच्या प्रस्तावर मंजूरी दिली.

त्यानुसार, औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले. शिवाय, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबईला लोकनेते दी. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतु, या नामांतराच्या निर्णयाला नव्या शिंदे सरकारने स्थगिती दिल्याची बातमी समोर आल्यावर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच, शिंदे सरकावर टीकाही केली जात आहे.


हेही वाचा – ‘ते’ तीन निर्णय फिरवले असतील तर, हे सरकार हिंदूत्वद्रोही; संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल