इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही: संजय राऊतांचा हल्लाबोल

सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे पाय कापण्याचे पंख कापण्याचे हा प्रयोग आहे. यात जर सत्ताधारी यशस्वी झाले तर पुढलं पाऊस टाकतील. असा आरोपही राऊतांनी केला आहे

sanjay raut

ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्षे हद्दपार झाले, त्यातील काही मोजके लोकं नंतर तरले पण बहुसंख्य आमदार खासदार पराभूत झाल्याचं इतिहास सांगतो आणि इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हल्लोबोल केला आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

शिवतारेंसह अनेक नेत्यांवर झालेल्या पक्षाविरोधी कारवाई राऊत म्हणाले की, बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान नाही, आपल्या बेईमानीचे कारणं देत असतो. शिवसेना सोडली आहे तर शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा, स्वतंत्र संसार मांडा… शिवसेना शिवसेना का करता, बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना आहे आणि भविष्यात राहिलं… त्या शिवसेनेच्या पंखाखाली का जगताय, नका जगू… तुम्हाला स्वाभिमान असेल… स्वाभिमानासाठी सगळे बाहेर पडलात मग तुम्ही शिवसेनेशिवाय तुमचे स्वतंत्र स्थान निर्माण करा, आणि जनतेला दाखवा. असे आव्हान त्यांनी बंडखोर नेत्यांना दिले आहे.

“राजकारणात एक दुजे के लिए हा नवीन सिनेमा सुरु”

हे सरकारचं बेकायदेशीर आहे. इतके दिवस होऊन सुद्घा मंत्रिमंडळ शपथविधी घेऊ शकत नाही, मंत्र्यांची नियुक्ती होऊ शकत नाही, एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री एक दुजे के लिए… राजकारणात एक दुजे के लिए हा नवीन सिनेमा सुरु आहे…. एक दुजे के लिए चा शेवट काय झाला हे आपल्याला माहित आहे. या चित्रपटाची कथा जरा समजून घ्या. त्यामुळे महाराराष्ट्रात एक दुजे के लिए हा जो सिनेमा पडद्यावर सुरु आहे… त्याचा राजकीय अंतही त्याच प्रकारे होईल, या बंडखोरांनी राजकीय आत्महत्या केली आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे.

ज्यांची हकालपट्टी करण्यात आलेले अनेक लोकं आहेत ज्यांचा भाजप – शिवसेना युती असताना पराभव झाला आहे. ज्यांना आज भाजपचा पुळका आला आहे अशी अनेक लोकं निवडणूकीत पराभूत झाले ते भाजप सेना युती असताना पराभूत झालेत. ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्षे हद्दपार झाले, त्यातील काही मोजके लोकं नंतर तरले पण बहुसंख्य आणि खासदार पराभूत झाल्याचं इतिहास सांगतो. आणि इतिहास बदलण्याची ताकद या गटात नाही, अशा शब्दात त्यांनी बंडखोर शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

…तर देशात लोकशाहीला सगळ्यात जास्त धोका 

संसदेत शब्दांचा वापर करावा लागतो. त्या शब्दांवर बंदी घालणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारख आहे, संसदीय लोकशाहीवर हा जबरदस्त हल्ला आहे. उद्या संध्याकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्त्वाखाली विरोधी पक्षांची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यावर आम्ही सगळे चर्चा करु… संसदेच्या आवारामध्ये आत्तापर्यंत आपल्या भावनांचा उद्रेक व्यक्त करण्यासाठी अनेक पक्षांचे खासदार.. भाजपचे खासदारही पूर्वी संसदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते. गांधीजींच्या पुतळ्याजवळ अनेक विषयांवर आंदोलन करत होतो. त्यावर सुद्धा बंदी टाकण्यात आली आहे, ही भीती कसली आहे? लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल तर, या देशात लोकशाहीला सगळ्यात जास्त धोका आहे. हे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आले आहे. मतपेटीतून निवडून आले.. अशावेळी तुम्ही लोकांचे प्रतिनिधी. जे परखड, स्पष्ट, कडक भाषेमध्ये जनतेचे प्रश्न आणि भूमिका मांडतात,.. त्यांची अशी मुस्काटदाबी करणार आहात का? तर या देशात लोकशाही आहे का असा प्रश्न जगाला पडेल. असही राऊत म्हणाले.

आणीबाणी असेल किंवा अन्य काही अशाप्रकारच्या घटना असतील तर देशातील जनतेने अशा मुस्काटदाबीविरोधात सतत आवाज उठवला पाहिजे. जगातील सर्वात मोठी लोकशाही जर आपण म्हणत असू तर या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे पाय कापण्याचे पंख कापण्याचे हा प्रयोग आहे. यात जर सत्ताधारी यशस्वी झाले तर पुढलं पाऊस टाकतील. असा आरोपही राऊतांनी केला आहे.


राज्यकर्ते गुरगुरताय आणि संसदेचा भित्रा ससा करून ठेवला; असंसदीय शब्दांवर शिवसेनेचे टीकास्त्र