घरताज्या घडामोडी'चीनपासून फडणवीसांपर्यंत' शरद पवारांची चिरफाड; संजय राऊत यांची खळबळजनक मुलाखत

‘चीनपासून फडणवीसांपर्यंत’ शरद पवारांची चिरफाड; संजय राऊत यांची खळबळजनक मुलाखत

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काही निर्णयांवरुन धुमशान सुरु असताना या आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे कायम सरकारच्या समन्वयकाची भूमिका घेताना दिसले आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यांनी दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सरकारमधील विसंवादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सामना दैनिकासाठी शरद पवारांची मुलाखत घेतल्याचे ट्विट केले आहे. ही मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असे सुतोवाच संजय राऊत यांनी केले आहे.

या मुलाखतीमध्ये “शरद पवारांनी चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडीपर्यंत जोरदार बोलले” असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. याचा अर्थ गेल्या काही दिवसांत देवेंद्र फडणवीस यांनी एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत जे गौप्यस्फोट केले त्याला आता पवार उत्तर देणार अशी अटकळ बांधली जात आहे. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला राष्ट्रवादीची ऑफर होती, मात्र ऐनवेळी शरद पवारांनी भूमिका बदलली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यानंतर राष्ट्रवादीकडून कोणतेही उत्तर आले नव्हते, मात्र या मुलाखतीच्या माध्यमातून खुद्द शरद पवार उत्तर देतील का? हे मुलाखत प्रदर्शित झाल्यानंतर कळेल.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -