घरमहाराष्ट्रजो डर गया वो मर गया, सत्तासंघर्षात राऊतांचं नवं ट्वीट

जो डर गया वो मर गया, सत्तासंघर्षात राऊतांचं नवं ट्वीट

Subscribe

महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून शिवसेनेतील फुटीच राजकीय नाट्य सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सत्ताबदल झाला, यानंतर शिवसेना आणि शिंदे गट असा राजकीय सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शिवसेना संपवण्यास जबाबदार धरले आहे. त्यामुळे शिंदे गटविरुद्ध शिवसेना हा वाद आता कोर्टात जाऊन पोहचला आहे.

शिवसेनेतील फुटीबाबत दाखल याचिकांतून घटनात्मक मुद्दे उपस्थित झाले असून, त्यावर व्यापक खंडपीठापुढे सुनावणीचे संकेत देत सरन्यायाधीश व्ही. एन. रमण यांनी बुधवारी या प्रकरणावर ‘जैसे थे’चे आदेश दिले. तसेच २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका मांडण्याचे निर्देश दोन्ही पक्षकारांना देताना न्यायालयाने पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी निश्चित केली. मात्र एकीकडे हा सत्तासंघर्ष सुरु असताना दुसरीकडे मात्र शिवसेनाच्या अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस बजावत चौकशीला बोलावले होते. एकूणच राज्यातील सत्तासंघर्ष आणि ईडीच्या कारवाईंबाबत संजय राऊतांनी एक सुचक ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये राऊतांनी ओशो यांची एक ओळ ट्विट केली आहे.

- Advertisement -

राऊतांनी ट्विटमध्ये लिहिले की, मनुष्य का हमेशा डर के माध्यम से ही शोषण किया जाता है !- ओशो जो डर गया वो मर गया. जय महाराष्ट्र!… या ट्विटसोबत राऊतांनी स्वत:चा एक फोटोही शेअर केला आहे.

- Advertisement -

गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 20 जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ते दिल्लीत असल्याने ईडी चौकशीला जाऊ शकले नाहीत. दरम्यान, आता त्यांना २७ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावरूनच राऊतांनी ट्विट हे ट्विट केल्याचे म्हटले जातेय. शिंदे गटातील आमदार आणि खासदारांनी संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवत, राष्ट्रवादीसोबत युती करण्यास भाग पाडले. त्याचबरोबर शिवसेना संपवण्याचा कट रचला असे अनेक आरोप भाजपा नेत्यांनी शिंदे गटातील अनेक बंडखोरांवर केला आहे. तसेच संजय राऊतांनीही वारंवार कठोर शब्दात एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर टीका केली आहे. यामुळे आता शिंदे गट विरुद्ध संजय राऊत असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.


संजय राऊतांची मागणी फेटाळली, ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -