घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंच्या हाती धनुष्यबाण आणि शिवसेना, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा धक्का

एकनाथ शिंदेंच्या हाती धनुष्यबाण आणि शिवसेना, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा धक्का

Subscribe

राज्याच्या राजकारणात आत्तापर्यंतची सर्वात मोठी घडामोड घडली आहे, केंद्रीय निवडणुक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला दिलं आहे. निवडणूक आयागोचा हा निर्णय ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का आहे.

 

- Advertisement -

एकनाथ शिंदे ४० आमदारांसोबत बाहेर पडत भाजपच्या पाठींब्याने सरकार स्थापन केले, यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आपला दावा केला, खरी शिवसेना आपलीच असा दावा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांकडून केला जात होता.  याप्रकरणी सुप्रीम कोर्टात लढाई सुरु आहे. मात्र आज अखेर केंद्रीय निवडणुक आयोगाने याबाबत आपला निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि नाव आता शिंदे गटाचं असणार आहे. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी राजकारणातील सर्वात मोठा धक्का आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -