मुंबई : राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमधील अनेक आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. अशात आता आणखी काही आमदार आणि खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ऑपरेशन टायगरसंदर्भात भाष्य करताना काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल असे म्हटले होते. त्यानुसार शिवसेन ठाकरे गटासह पुण्यातील काही आमदार हे शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार असं बोललं जात आहे. (shiv sena operation tiger with 6 leaders in shiv sena including 3 former mla from pune)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यापार्श्वभूमीवर एकीकडे शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटही अधिक सक्रीय झाला आहे. त्यात या निवडणुकांसाठी शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसलाही धक्का देण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे.
शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली 5 माजी आमदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. उदय सामंत यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामध्ये, 2 काँग्रेस नेते आणि 4 माजी आमदार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचाही ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना बैठकीत नाराज होऊन उठून गेलेले चंद्रकांत मोकाटेही ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर व हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली.
कोण-कोणते आमदार, खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात
- रविंद्र धंगेकर, काँग्रेसचे माजी आमदार
- महादेव बाबर, ठाकरे गटाचे माजी आमदार हडपसर
- चंद्रकांत मोकाटे, कोथरूडचे माजी आमदार ठाकरे गट
- गणपत कदम, रत्नागिरीचे माजी आमदार ठाकरे गट
- सुभाष बने, संगमेश्वर माजी आमदार ठाकरे गट
- रमाकांत म्हात्रे, कॅाग्रेस नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर
हेही वाचा – Sanjay Raut : माझं आणि त्यांचं बोलणं झालं ते…; राजन साळवींच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेवर राऊतांचं वक्तव्य