Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कुंभकर्णाला जागे करण्यासाठी शिवसेनेची पंढरपूरात सभा

कुंभकर्णाला जागे करण्यासाठी शिवसेनेची पंढरपूरात सभा

Subscribe

राम मंदिराचा विषयात कोर्टाकडे बोट दाखवून चालणार नाही. इतर निर्णय घेताना कोर्टाचे निर्देश डावलून कायदे केले जातात, मग याही विषयामध्ये अध्यादेश काढून राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावावा किंवा तो प्रश्न सोडवणार की नाही? याबाबतही सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी. कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आम्ही २४ डिसेंबर रोजी पंढरपूर येथे सभा घेणार आहोत, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.

राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती उत्पन्न झाली असून शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. दुष्काळग्रस्त भागात कामांची स्थिती जाणून घेण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खल करण्यात आला. निवडणूका आणि दुष्काळ दोन्ही गोष्टी जवळ आल्या आहेत. त्यामुळे सरकारला दोन्ही गोष्टींवर उत्तर द्यावे लागेल, असेही उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -