Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रShiv Sena Pramukh : विचारधारेशी समर्पण आणि तत्वांशी कटिबद्धता... अमित शहांचा उद्धव...

Shiv Sena Pramukh : विचारधारेशी समर्पण आणि तत्वांशी कटिबद्धता… अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Subscribe

देशात जेव्हा विचारधारेशी समर्पण आणि तत्वांशी कटिबद्धता यांचा मुद्दा येतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची निश्चितपणे आठवण येते. प्रतिकूल परिस्थितीतही, विचारधारा आणि राजकीय मूल्ये यांच्याशी तडजोड न करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची, सनातन संस्कृती आणि धर्माबद्दलची कटिबद्धता प्रेरणादायी आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

(Shiv Sena Pramukh) नवी दिल्ली : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोप तसेच दावे-प्रतिदावे केले जात आहेत. विशेषत:, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी केल्यामुळे भाजपाने जास्तच हल्लाबोल सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त ट्वीट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी मुख्यमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. (Amit Shah targets Uddhav Thackeray while paying homage to Balasaheb)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रविवार, 17 नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन असल्याने महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दादर येथील शक्तिस्थळावर येत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनीही ट्वीट करून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. आपले संपूर्ण आयुष्य सनातन संस्कृती आणि राष्ट्रहितासाठी समर्पित करणारे प्रखर नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे स्मरण करून त्यांना वंदन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

देशात जेव्हा विचारधारेशी समर्पण आणि तत्वांशी कटिबद्धता यांचा मुद्दा येतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची निश्चितपणे आठवण येते. प्रतिकूल परिस्थितीतही, विचारधारा आणि राजकीय मूल्ये यांच्याशी तडजोड न करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची, सनातन संस्कृती आणि धर्माबद्दलची कटिबद्धता प्रेरणादायी आहे, असे सांगत अमित शहा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – RokhThok : अमित शहांचे नाटक महाराष्ट्राने पाहिले, संजय राऊतांचा घणाघात

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते अलीकडेच भाजपाचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर केलेल्या हातमिळवणीवरून टीका केली होती. ज्या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला, त्यांचे समर्थन उद्धव ठाकरे करत आहेत. सावरकर आणि बाळासाहेब यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यांकडून गौरवौद्गार वदवून घ्यावेत, असे आव्हानही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले होते, हे उल्लेखनीय.

तथापि, शिर्डीमध्ये काल, शनिवारी झालेल्या सभेत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे आणि आमची विचारधारा वेगळी होती. पण बाळासाहेब आणि काँग्रेस या दोघांनीही नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केला, हे लक्षात घ्यावे, असे त्यांनी भाजपाला सुनावले. (Shiv Sena Pramukh: Amit Shah targets Uddhav Thackeray while paying homage to Balasaheb)

हेही वाचा – Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का? राऊतांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -