शिवसेनेकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी; राऊतांकडून मिशन जाहीर

"योगींना आम्ही ओळखतो, मालमत्तेची किंमत वाढते. योगी हे खरे फकीर आहेत हे मला माहित आहे. त्यांच्या मालमत्तेविषयी मी बोलणार नाही'' अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

Sanjay Raut targets pm modi said center agency Separate syndicate started with BJP leaders

देशात विधानसभा निवडणुकांपूर्वी देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा जिंकण्यासाठी भाजप-सेनेत ठक्कर पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊतांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी करतेय असं म्हणत संजय राऊतांकडून शिवसेनेचे आगामी मिशन जाहीर केले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “उत्तर प्रदेशात शिवसेना निवडक 50 ते 55 जागांवर लढणार आहे. हा पक्षविस्ताराचा एक कार्यक्रम आहे, त्याताही काही उमेदवार पश्चिम उत्तर प्रदेश, लखनऊच्या आसपासचे आहेत. पाचव्या पेजमध्ये अयोध्या, बंका, फैजाबाद या भागात शिवसेनेने उमेदवार उभे केलेत. सहाव्या सातव्या पेजमध्ये वाराणसी, अलाहाबाद येथे उमेदवार असतील. ही शिवसेनेची 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा लढणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना साधारण 100 उमेदवार उभे करू शकेल का याची ताकद पाहतोय,” असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

“भाजपला ओवैसींचा उत्तर प्रदेशमध्ये हवा तसा उपयोग होत नाही”

 उत्तर प्रदेशात एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर झालेल्या गोळ्याबारावरून संजय राऊतांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “देशातील प्रमुख नेत्यावर उत्तर प्रदेशसारख्या योगींच्या राज्यात गोळ्या झाडण्याची हिंमत कोण करेल? कायदा सुवस्थेच्या बाबतीत त्यांचा एवढा गवगवा सुरु आहे की, आम्ही फार कठोर आहोत, कडक आहोत, कायदा सुव्यवस्था आमची फार मजबूत आहे. आणि देशातील एका प्रमुख नेत्यावर ५ गोळ्या फायर होतात आणि एकही गोळी लागत नाही? सगळ्या गोळ्या टायरवर लागतात? याचा अर्थ असा की, भाजपला ओवैसींचा उत्तर प्रदेशमध्ये हवा तसा उपयोग होत नाही. लोकांचे लक्ष्य वेधून ते घेत नाहीत. मुस्लीम त्यांच्याकडे आकर्षित होत नाहीत. मग त्यांना पिक्चरमध्ये कसे आणयाचे ते अशाप्रकारचे काहीतरी असू शकेल,” अशी जहरी टीका राऊतांनी केली आहे.

“योगी हे खरे फकीर”

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांच्या मालमत्तेची विशेष चर्चा सुरु आहे. यावरूनही संजय राऊत यांनी योगींवर टीका केली आहे. “योगींना आम्ही ओळखतो, मालमत्तेची किंमत वाढते. योगी हे खरे फकीर आहेत हे मला माहित आहे. त्यांच्या मालमत्तेविषयी मी बोलणार नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.  उत्तर प्रदेशात प्रियांका गांधींना चांगला पाठिंबा मिळतोय. पण अखिलेश यादव हे विजयाच्या दिशेने कूच करतायत हे चित्र स्पष्ट आहे,” असा दावाही राऊतांनी  केला आहे.


शेण खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा, सोमय्यांच्या आरोपांवर संजय राऊतांचे प्रतिउत्तर