“मी त्यांची विनंती लगेच मान्य करतो”; सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य

येत्या १ ऑगस्टला शिंदे गटातील अपात्र आमदारांबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान या सर्व राजकारणानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुखपृष्ठ सामनाला रोखठोख मुलाखत दिली आहे.

येत्या १ ऑगस्टला शिंदे गटातील अपात्र आमदारांबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान या सर्व राजकारणानंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुखपृष्ठ सामनाला रोखठोख मुलाखत दिली आहे. आजच्या सामनामध्ये या मुलाखतीबाबात माहितीही देण्यात आली आहे. शिवाय शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संजय राऊतांच्या एका प्रश्नावर उद्धव ठाकरे “मी सर्वांची विनंती मान्य करीन”, असे उत्तर दिल्याचे लिहिण्यात आले आहे. (shiv sena president uddhav thackeray interview samana sanjay raut)

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. दरम्यान, या मुलाखतीमधील एक प्रश्न संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. त्यानुसार, “मी: साहेब, फुटीर गटाची तुम्हाला एक विनंती आहे. उद्धवजी : बोला..मी त्यांची विनंती लगेच मान्य करतो. खळबळ जनक मुलाखत. सामना: 26 आणि 27 जुलै”, असे ट्विट राऊतांनी केले आहे.

याशिवाय, ”जोरदार मुलाखत. सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे. महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेली मुलाखत”, असेही ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

बंड पुकारल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात नवे शिंदे गट आणि भाजपाचे नवे सरकार स्थापन झाले. शिवाय या सरकार स्थापनेनंतर शिवसेना कोणाची असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. कारण शिवसेनेचे सर्वाधिक म्हणजे ४० आमदार हे शिंदे गटाच्या बाजूने आहेत. तसेच, १५ आमदार हे शिवसेनेच्या बाजूने आहेत. त्यामुळे शिवसेना आणि चिन्ह कोणाचे असा सवाल उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणे बाकी आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यातील राजकारण बरेच बदलले. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण त्यानंतरही राज्यातील राजकारण काही शांत झाले नाही. बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टिका करत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत बंड केले. त्यानंतर अनेक नगरसेवक आणि कार्यकर्तेही शिंदे यांच्या गटात सामील झाले. इतकेच नाही तर राज्यातील शिवसेनेच्या खासदारांनीही शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, आता शिवसेना कुणाची याची लढाई सुरु झाली आहे. हे प्रकरण न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे आहे. लवकरच याबाबात सुनावणी होणार आहे. पण त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची मुलाखत होणार आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच मुलाखत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब पुरंदरेंनी अन्याय केला; शरद पवारांचा आरोप