संजय राऊतांच्या सुटकेसाठी सुनील राऊत दिल्लीत

shiv sena sanjay raut bail sunil raut reached delhi directly

शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सध्या ते आर्थररोड जेलमध्ये आहेत. मागील एक महिन्यापूर्वी संजय राऊत यांनी ईडीने अटक केली, तेव्हापासून ते कोठडीत आहे. यात अद्याप त्यांचा जामीन मंजूर झाला नसल्याने त्यांचा भाऊ सुनील राऊत जामिनासाठी प्रयत्न करत आहे. अलीकडेच सुनील राऊत यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेत चर्चा केली, यानंतर थेट त्यांनी दिल्ली गाठले आहे. संजय राऊतांच्या या प्रकरणातील सुटकेसाठी सुनील राऊत दिल्लीत वरिष्ठ वकिलांशी चर्चा करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान सुनील राऊत हे दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेत संजय राऊतांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत मागील महिन्याभरापासून आर्थर रोड तुरुंगातील न्यायालयीन कोठडीत आहेत. यात त्यांच्या कोठडीत वाढ करण्याच आली. त्यामुळे संजय राऊत यांनी दोन वेळा जामीनासाठी अर्ज केला. परंतु त्यांच्या जामीन अर्ज मंजूर झालेला नाही. दरम्यान ईडीने कोर्टाकडे चौकशीसाठी अजून वेळ मागवून घेतला आहे. दरम्यान या प्रकरणी आता सुनील राऊत वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत पोहचल्याचे बोलले जात आहे.

संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत काल रात्री उशीरा मातोश्रीवर दाखल होत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आलेय. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी मला भेटायला बोलावले होते. यावेळी त्यांनी राऊत कुटुंबियांची विचारपूस केली अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला आहे. मला खात्री आहे की संजय राऊत यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे लवकरात लवकर जामीन मिळेल असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सुनील राऊत माध्यमांशी बोलत होते. या भेटीनंतर आत ते दिल्लीत दाखल झाले आहे. त्यामुळे सुनील राऊत यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर संजय राऊत यांची सुटका होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


भाजपचा २०२४ लोकसभा निवडणुकीचा मास्टर प्लान तयार, १५ राज्यात प्रभारी नियुक्त, महाराष्ट्राच्या चार नेत्यांचा समावेश