…तर, आपण राज्याचे मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांना टोला

shiv sena sanjay raut criticized bjp and devendra fadnavis and eknath shinde

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातवरण चांगलेच तापले होते, यात्र दोन आठवड्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच हे वातावरण काही प्रमाणात थंड झाले आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागल्याने शिंदे गटविरुद्ध ठाकरे गट असे युद्ध सुरु झाले आहे. फडणवीस यांच्या चाणक्यनितीने शिंदे गटाने बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा केल्याचा आरोप वारंवार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. पण फडणवीसांना एवढे प्रयत्न करुनही त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले. भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्यात आले, तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदासाठी आयत्यावेळी शपथ घ्यावी लागली. यामुळे फडणवीस पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. “बाळासाहेबांचे आशीर्वाद खरोखर लाभले असते तर आपण राज्याचे मुख्यमंत्री असता, मात्र आज तुम्हाला उपमुख्यमंत्री पदावर बसावे लागेल” अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की,  बाळासाहेबांचे नाव आग आहे आणि आगीशी खेळू नका. आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला त्यांचे नुसते हात पोळले नाहीत, तर त्यांची राजकीय कारकिर्द देखील पोळली गेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना कैद करुन ठेवले आहे.

बाळासाहेबांचे आशीर्वाद खरोखर लाभले असते तर आपण राज्याचे मुख्यमंत्री असता. आज उपमुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसावे लागेल. बाळासाहेबांचे नाव आग आहे आणि आगीशी खेळू नका. आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला त्यांचे नुसते हात पोळले नाहीत, तर त्यांची राजकीय कारकिर्द देखील पोळली गेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना कैद करुन ठेवले आहे. त्यांच्या ताब्यात ठेवले. ज्यांचा त्यांचा निर्णय आहे. त्यांच्याविषयी बोलणं आम्ही थांबवल आहे, ते महाराष्ट्रात आले आहेत आणि त्यांना आता आपल्या मतदार संघात जायचे आहे. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांना लख लाभो. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे नेणार आहे. हीच शिवसेना भविष्यात राज्याचं नेतृत्व करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


परीक्षेचा निकाल आधीच आला, शिवसेनेला अजून अभ्यास करावा लागेल; लाड यांचा टोला