“नाहीतर ED, NIA, CBI चौकशी करायला लावू”, मिलिंद नार्वेकरांना धमकीचा मेसेज

मिलिंद नार्वेकर यांनी धमकीचा मेसेज आल्यावर मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार दाखल केली

shiv sena secretary milind narvekar get threatend message from unknown number
"नाहितर ED, NIA, CBI चौकशी करायला लावू", मिलिंद नार्वेकरांना धमकीचा मेसेज

आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा ईडी, एनआयए आणि सीबीआय चौकशी करायला लावू असा धमकीचा मेसेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना आला आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून हा धमकीचा मेसेज आला आहे. धमकीचा मेसेज आला असल्याची तक्रार मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातले सहकारी म्हणून मिलिंद नार्वेकर ओळखले जातात. मात्र मेसेज करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने नार्वेकर यांच्याकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत याबाबत अद्याप समजलं नाही आहे.

मिलिंद नार्वेकर यांना वॉट्सअॅपवर धमकी देणारा मेसेज प्राप्त झाला आहे. हा मेसेज अज्ञात व्यक्तीने केला असून या व्यक्तीने कोणत्या मागण्या केल्या आहेत. कोणती मागणी करण्यात आली याचा तपशील समोर आळा नाही. परंतू आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीतर ED, NIA, CBI चौकशी करायला लावू अशी धमकी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशी सुरु आहे. यामध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनाही तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लावण्याची धमकी देण्यात आली आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी धमकीचा मेसेज आल्यावर मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलीस याबाबत काय चौकशी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. तसेच मुंबई प्रीमीअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष देखील आहेत.

नार्वेकरांच्या बंगल्यावरुन किरीट सोमैय्यांचा आरोप

भाजप माजी खासदार किरीट सोमैय्या महाविकास आघाडीमधील नेत्यांवर विविध आरोप करून चौकशीचा ससेमीरा मागे लावत आहेत. यामध्ये सोमैय्यांनी मिलिंद नार्वेकरांच्या कोकणातील बंगल्यावरुन आरोप केला होता. मिलिंद नार्वेकर यांनी मुरुडमधील समुद्र किनाऱ्याच्या बाजूला जागा घेतली आणि विनापरवानगी बंगला बांधला असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे. बंगला बांधण्याठी परवानगी न घेता दुमजली इमारत उभी केली आहे. यासाठी आजूबाजूच्या परिसरातील झाडांची कत्तल केली असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला होता. याबाबत किरीट सोमैय्या यांनी तक्रारही दाखल केली होती.