शिवसेना नेत्या शितल म्हात्रेंच्या ‘त्या’ व्हिडिओप्रकरणी दोन जणांना अटक

शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेतील शितल म्हात्रेंचा व्हिडीओ फॉरवर्ड करून व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अशोक मिश्रा आणि मानस कुवर असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

sheetal mhatre

मुंबई – शिवसेना आशीर्वाद यात्रेतील शितल म्हात्रे यांचा व्हिडिओ फॉरवर्ड करून व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अशोक मिश्रा आणि मानस कुवर असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ व्हिडिओ असल्याचा आरोप करत दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. (shiv sena sheetal mhatre viral video two people arrested in mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अंधेरी विधानसभेचे उपविभाग प्रमुख अशोक मिश्रा यांना शनिवारी रात्री दहिसर पोलिसांनी अटक केली. अशोक मिश्रा यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला.

याप्रकरणी रविवारी पहाटेच्या सुमारास शीतल म्हात्रे यांनी याबाबत दहिसर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा व्हिडीओ फॉरवर्ड करून व्हायरल करणाऱ्या दोघांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर याप्रकरणी चौकशी  केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी रात्री हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रात्री उशिरा दहिसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


हेही वाचा – ‘त्या’ व्हिडीओप्रकरणी शीतल म्हात्रे अ‍ॅक्शन मोडवर; म्हणाल्या, बहिण-भावाच्या नात्याला…