आमचा पक्ष अधिकृत शिवसेना आहे, निवडणूक आयोगानं आम्हाला चिन्हही दिलं आहे. त्यामुळे आम्ही धनुष्यबाण चिन्हावरच लढणार आहोत. परंतु जर काही तांत्रिक अडचण आली आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला तर आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार आहोत, असं मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या विधानानं मात्र राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. ( Shiv Sena Shinde group MLA Kishore Patil has expressed the opinion that we are ready to contest the election on the lotus Symbol BJP )
आज राज्यात भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 200 पेक्षा अधिक जागा मिळवणार आहोत, हेच खरं वास्तव आहे, असं मतही आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह यावरून दोन गटाक वाद सुरू आहे. याआधीच निवडणूक आयोगानं मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असेल, असा निर्मय दिला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह कोणाचं यााबबत अद्याप संभ्रम कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयही प्रलंबित आहे, त्यातच आमदार किशोर पाटील यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
( हेही वाचा: Prakash Ambedkar : संघाचा काळा इतिहास…; आंबेडकरांची RSSवर सडकून टीका )