घरताज्या घडामोडीशिवभोजन थाळीला आता भाजपच्या दीनदयाळ थाळीची टक्कर

शिवभोजन थाळीला आता भाजपच्या दीनदयाळ थाळीची टक्कर

Subscribe

११ फेब्रवारीपासून शिवभोजन थाळीला दीनदयाळा थाळी टक्कर द्यायला येणार आहे. पंढरपूर येथे ही पहिली थाळी सुरू करण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या महत्त्वाकांशी अशा शिवभोजन थाळीला आता भाजपची दीनदयाळ थाळी टक्कर देणार असून लवकरच ही थाळी सुरू होणार आहे. भाजपसोबत जोडलेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून ही दीनदयाळ थाळी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जरी ही थाळी १० रुपयांत नसली तरी या ३० रुपयांच्या थाळीमध्ये १० पदार्थ देण्यात येणार आहेत.

११ फेब्रुवारीपासून दीनदयाळ थाळी

दरम्यान ही थाळी ११ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे पहिली ही थाळी सुरू करण्यात येणार आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या शिवभोजन थाळीमध्ये १० रुपयांमध्ये भात, भाजी, वरण आणि पोळी असे चार पदार्थ दिले जातात. मात्र दीनदयाळ थाळीमध्ये तीन चपात्या, डाळ, भात, भाजी, चटणी, पापड, लोणचे, कांदा लिंबू यांचा आस्वाद घेता येणार आहे.

- Advertisement -

म्हणून पंढरपूर येथून थाळीला सुरूवात

दरम्यान भाजपकडून सुरू करण्यात येणाऱ्या दीनदयाळ थाळीची सुरुवात ही तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथून सुरू करण्यात येणार आहे. पंढपूर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. या भाविकांना कमी दरात आणि चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे म्हणून या थाळीची सुरुवात पंढरपूर येथून करण्यात येणार असल्याचे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. दरम्यान यानंतर संपूर्ण राज्यात देखील ही दीनदयाळ थाळी सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – दारुची खबर देणाऱ्या खबऱ्यांच्या बक्षिसात वाढ – अजित पवार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -