घरमहाराष्ट्रशिवसेनेला मुंबईतही धक्के; दोन शाखाप्रमुखांचे राजीनामे

शिवसेनेला मुंबईतही धक्के; दोन शाखाप्रमुखांचे राजीनामे

Subscribe

मुंबईतच शाखा क्रमांक 3चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि शाखा क्रमांक 12चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 39 शिवसेना आमदारांनी उठाव केल्याने शिवसेनेला जबरदस्त हादरा बसला. यातून सावरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्नात असतानाच मुंबईतील दोन शाखाप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे बालेकिल्ल्यातच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अशात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सावरण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना भवनात एकापाठोपाठ एक बैठकांचे सत्र सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरील फुटीचे लोण इतर स्तरांपर्यंत पोहोचू न देण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबई आणि ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ले. एकनाथ शिंदे यांचा ठाण्यातील प्रभाव लक्षात घेता, तिथे सर्वच स्तरावर मोठ्या प्रमाणावर फाटाफूट होईल, असेच चित्र आहे. पण मुंबईतच शाखा क्रमांक 3चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि शाखा क्रमांक 12चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

प्रकाश पुजारी यांनी यासंदर्भात शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस यांना पत्र लिहिले आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी असलेले माझे घनिष्ठ संबंध पाहता प्रभागातील पदाधिकारी व शिवसैनिक माझ्याकडे नाहक संशयाने पाहत असून माझ्याबाबतीत चुकीचे संदेश पोहचवत आहेत. मी याकारणाने माझ्या शाखाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. तर, शिवसेना शाखा क्रमांक 12चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांच्यासह महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला.


हेही वाचाः शिवसेनेच्या प्रतोदपदावरून भावना गवळींची उचलबांगडी, ठाण्याच्या खासदाराची नियुक्ती

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -