Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राणेंवरील आरोपांचं भांडवल: शिवसेनेने LED स्क्रिनवर झळकवले सोमय्यांनी केलेले आरोप

राणेंवरील आरोपांचं भांडवल: शिवसेनेने LED स्क्रिनवर झळकवले सोमय्यांनी केलेले आरोप

नारायण राणेंची पोलखोल केली होती त्याची आठवण शिवसेनेच्या माध्यमातून किरीट सोमय्यांना करून दिली जात आहे.

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नारायण राणेंच्या विरोधात ज्या स्टेटमेंट केल्या होत्या त्याची आठवण करून देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने एक वेगळी शक्कल लढवली. नारायण राणेंच्या बोगस कंपन्या , बेनामी व्यवहार , राणेंचे घोटाळे याबाबत चौकशी करण्याची गरज आहे. अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केली होती त्याची व्हिडीओ क्लिप कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालया बाहेर एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक हे स्वतः शिवसैनिकांसह शाखेत उपस्थित होते. सोमय्यांचा व्हिडिओ मोठ्या आवाजात दाखवल्यामुळे कणकवलीत तणावपुर्ण वातावरण झालं होते.

शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले, किरीट सोमय्या भ्रष्टाचारा विरोधात फिरत आहेत. राजकीय हेतूने विरोधकांवर कारवाईसाठी ते प्रयत्न करत आहेत असे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी यापूर्वी नारायण राणेंच्या गैरव्यवहाराबाबत ज्या स्टेटमेंट केल्या होत्या. नारायण राणेंची पोलखोल केली होती त्याची आठवण शिवसेनेच्या माध्यमातून किरीट सोमय्यांना करून दिली जात आहे. राणेंची बेनामी संपत्ती कशी वाढली हे देखील किरीट सोमय्यांनी जनतेसमोर आणावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

- Advertisement -

कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या वतीने “किरीट सोमय्या तुम्ही बोलला त्याचा काय झालं? आज सांगाल का? सिंधुदुर्ग आपली वाट बघतोय” या मथल्या खाली एलईडी स्क्रीन लावून त्या स्क्रीनवर नारायण राणे यांच्या बद्दल किरीट सोमय्या यांनी केलेल्या त्यावेळच्या वक्तव्यांची आठवण करून देणारी व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. किरीट सोमय्या हे कणकवलीत आल्याने कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या संख्येने शिवसैनिक एकवटले होते. तसेच प्रतिभा दूध डेअरीकडे थकीत असलेले दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी किरीट सोमय्या साहेब आपण लक्ष द्याल का? अशा आशयाचे बॅनर देखील कणकवलीमध्ये लावण्यात आले आहेत.


हेही वाचा : अनिल परब यांच्या दोन अनधिकृत रिसॉर्टमुळे लवकरच गुन्हा दाखल होणार; किरीट सोमय्यांचा दावा


- Advertisement -

 

- Advertisement -