Farm Laws: महाभारत आणि रामायणात शेवटी अहंकाराचाच पराभव, शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

विरोधकांचा आवाज दडपण्यात आला...

PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर काल (शुक्रवार) खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना विजय मिळाला. दरम्यान, काळे कायदे व शेतकऱ्यांचे हक्क चिरडणारे म्हणून या तीन कृषी कायद्यांची बदनामी झाली होती. शेतजमिनी, कृषी उत्पन्न बाजार समित्या खासगी भाडंवलदारांच्या घशात घालणाऱ्या या कायद्यांना शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. तसेच शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते तर मग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यांपुढे पांढरे निशाण का फडकविले?, अशा प्रकारचा प्रश्न विचारत सामनामधून सरकारचा समाचार घेतला आहे. तसेच हा अहंकाराचा पराभव आहे. अशा शब्दांत शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकशाही आंदोलनातून जे साध्य होऊ शकले नाही ते आगामी निवडणुकींच्या भीतीने साध्य झाले आहे. असं काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांनी म्हटले आहे. शेतकरी लढत राहीले, शहीद झाले व शेवटी जिंकले. १३ राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यातून आलेले हे शहाणपण आहे. शेतकरी खलिस्तानवादी अतिरेकी होते. तर मग पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकविले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कायदे आणण्यापूर्वी केंद्र सरकारने अहंकार बाजूला ठेवावा. असं म्हणत दैनिक सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

विरोधकांचा आवाज दडपण्यात आला

काळे कायदे व शेतकऱ्यांचे हक्क चिरडणारे म्हणून या तीन कृषी कायद्यांची बदनामी झाली होती. शेतजमिनी, कृषी उत्पन्न बाजार समित्या खासगी भांडवलदारांच्या घशात घालणाऱ्या या कायद्यांना शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. बहुमताच्या जोरावर सरकारने कायदे मंजूर करून घेतले, विरोधकांचा आवाज दडपण्यात आला व काही झाले तरी माघार घेणार नाही अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी यांनी घेतली होती. शेतकऱ्यांचे वीज आणि पाणी देखील बंद केले होते. दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांच्या टोळ्या देखील पाठवल्या. तरीही शेतकरी जागचे हटले नाहीत. लखीमपूर खिरी येथे सुद्धा केंद्रीय मंत्रिपुत्राने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडून मारले. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी साधा शोकही व्यक्त केला नाही. असा टीका शिवसेनेने केली आहे.

महाभारत आणि रामायणात शेवटी अहंकाराचाच पराभव

महाभारत आणि रामायणात शेवटी अहंकाराचाच पराभव झाला. हे सध्याचे नकली हिंदुत्ववादी विसरले व त्यांनी रावणाप्रमाणे सत्य व न्यायावरच हल्ला केला. शेतकरी लढत राहीले, शहीद झाले व शेवटी जिंकले. १३ राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यातून आलेलं हे शहाणपण आहे.