घर देश-विदेश महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची धाकधूक वाढली; सरन्यायाधीशांसह दोन न्यायाधीश क्वारंटाइन

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची धाकधूक वाढली; सरन्यायाधीशांसह दोन न्यायाधीश क्वारंटाइन

Subscribe

अमर मोहिते

नवी दिल्लीः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षचा निकाल कधी लागेल याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठातील एक न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड हे क्वारंटाइन झाले आहेत. परिणामी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची धाकधूक आणखी वाढली आहे.

- Advertisement -

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर सध्या समलिंगी विवाहाला मान्यता द्यावी की नाही या मुद्द्यावर सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्या. संजय कृष्णा कौल, न्या. एस. रवींद्र भट, न्या. पी. एस नरसिम्हा व न्या. हिमा कोहली हे या घटनापीठात आहेत. यातील न्या. भट यांना कोरोनाची लागण झाली आहे. सरन्यायाधीश चंद्रचुड व अन्य न्यायाधीश क्वारंटाइन झाले आहेत. समलिंगीची सुनावणी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. एम. आर. शाह, न्या कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर झाली. यातील न्या. न्या. एम. आर. शाह हे १५ मे २०२३ रोजी निवृत्त होत आहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल १५ मेपर्यंत अपेक्षित आहे. हा निकाल येत्या काही दिवसांत कधीही लागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही राजकीय नेते तर शिंदे-फडणवीस सरकार पडणार असा दावा करत आहेत. सत्तासंघर्षाचा निकाल येत्या काही दिवसांत लागू शकतो अशी अपेक्षा असतानाच सरन्यायधीश चंद्रचुड, न्या. पी. एस. नरसिम्हा आणि न्या. हिमा कोहली क्वारंटाइन झाले आहेत. सत्तासंघर्षाच्या निकालाचे टेंन्शन वाढले आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ताबदलाची चर्चा जोरदार सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार, शिंदे-फडणवीस सरकार जाणार, असे तर्क लावले जात आहेत. तर अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही आमदार घेऊन भाजपसोबत जाणार, असेही बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. त्यात सरन्यायाधीश चंद्रचूड व अन्य दोन न्यायाधीश क्वारंटाइन झाल्याने निकालाची धाकधूक वाढली आहे.

दरम्यान,  न्या. भट यांच्याशिवाय न्या. संजीव खन्ना, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. जेबी परडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -