घरताज्या घडामोडीराष्ट्रपती निवडणुकीतील पाठिंब्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेत फूट, ठाकरेंकडे सर्वाधिकार

राष्ट्रपती निवडणुकीतील पाठिंब्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेत फूट, ठाकरेंकडे सर्वाधिकार

Subscribe

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील पाठींब्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वाधिकार देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ठाकरे येत्या एक दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करतील.

येत्या १८ जुलै रोजी होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील पाठिंब्यावरून शिवसेनेत फूट पडली आहे. बहुसंख्य खासदारांनी भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. तर संजय राऊत यांनी यशवंत सिन्हा यांना पाठींबा देण्याची मागणी बैठकीत केल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील पाठींब्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वाधिकार देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ठाकरे येत्या एक दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करतील. (Shiv Sena splits on support issue in presidential election, Thackeray has supremacy)

हेही वाचा – मातोश्रीवर खासदारांची बैठक का झाली? संजय राऊतांनी सांगितलं कारण, म्हणाले राष्ट्रपती…

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांचे बंडाच्या हादऱ्यातून शिवसेना अद्याप सावरलेली नसताना शिवसेना खासदार राहुल शेवाळे, राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली आहे. खासदारांकडून होत असलेल्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत पाठिंब्यावरून शिवसेना खासदारांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले.

आजच्या बैठकीत अनेक खासदारांनी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी करताना शिंदे गट आणि भाजपशी जुळवून घेण्याची विनंती ठाकरे यांना केली. भाजपशी पुन्हा युती करणे हे पक्षाच्या हिताचे आहे, असे या खासदारांनी सांगितले. तर संजय राऊत यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील अन्य उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या बाजूने आपले मत मांडल्याचे समजते. आजच्या बैठकीत अनेक खासदारांनी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केल्याची माहिती खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना पवारसाहेब लाडके, शिवसैनिक परके; दीपक केसरकरांची टीका

दरम्यान, आजच्या बैठकीत दोन्ही बाजूने म्हणजे द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा अशा दोन्ही बाजूने चर्चा झाली. शिवसेनेने यापूर्वी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जात टी. एन. शेषन, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील पाठींब्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. देशातील आणि राज्यातील जनतेच्या भावना समजून घेऊन पक्षप्रमुख निर्णय घेतील. या निर्णयाच्या पाठीशी शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार उभे राहतील, असे संजय राऊत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच

आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेत कुणाला पदावर ठेवायचे आणि कुणाला नाही, याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हा अधिकार नाही असे ज्यांना वाटते तो त्यांचा भ्रम आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

हेही वाचा – शिवसेनेचे खासदारही वेगळ्या मार्गाच्या विचारात, ठाकरेंच्या बैठकीला फक्त 12 खासदार उपस्थित, 7 गैरहजर

सात खासदारांची बैठकीकडे पाठ

दरम्यान मातोश्रीवरील बैठकीकडे श्रीकांत शिंदे, भावना गवळी, संजय जाधव, हेमंत पाटील, कृपाल तुमाने, संजय मंडलिक आणि कलाबेन डेलकर या सात खासदारांनी पाठ फिरवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -