घरमहाराष्ट्र'सीएम म्हणजे करप्ट मॅनच', आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर मोठा आरोप

‘सीएम म्हणजे करप्ट मॅनच’, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर मोठा आरोप

Subscribe

महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं असताना आता आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वाद पेटताना दिसून येतोय.

महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं असताना आता आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला वाद पेटताना दिसून येतोय. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी आता मुंबईतील रस्ते आणि पुलाच्या कामावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट केलंय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मोठे आरोप करत सीएम म्हणजे करप्ट मॅनच असं म्हटलंय.

मुंबईतील रस्त्यांची आणि उड्डाणपुलांची दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ बंद आहेत. नियमीत पुरवठादारांकडून खडी पुरवठ्याच्या अभावामुळे ही कामं बंद असल्याचं सांगून आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका प्रशासनाला सवाल केलाय. मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदाराला कंत्राट द्यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दबाव आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला आहे. तसंच खडी पुरवठ्याच्या कंत्राटामध्ये मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप असल्याचाही आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. रस्ते, पुलाच्या कामाबाबत मुंबई महापालिकेने स्पष्टीकरण देण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्ते आणि पुलाच्या कामाची पाहणी केल्यानंतर खडीच्या टंचाईमुळे काम ठप्प असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मुख्यमंत्र्यांच्याच कंत्राटदाराकडून खडी पुरवठादारांवर दबाव आणून एकाच कंपनीकडून खडी घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय.

हे ही वाचा: मोठी बातमी ! नवी मुंबई, पनवेल आणि ठाण्यातील अनेक भागांत बत्ती गुल!

- Advertisement -

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘करप्ट मॅन’ असा केला आहे. ज्या ज्या खात्यांमध्ये घोटाळे दिसत आहेत, ती सर्व खाते मुख्यमंत्र्यांकडेच असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. खडीचे दर ५० टक्क्यांहून जास्त वाढले असून परिणामी रस्ते पुलांच्या खर्चातदेखील वाढ होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

हे ही वाचा: दारू फुकट मिळाली म्हणून इतका प्यायला की जागेवरच…, घटना वाचून तुम्हालाही धक्का बसेल!

डिलाईल रोड पूल किंवा आणखी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची पालिकेने हाती घेतलेली कामे आता 31 मेपूर्वी पूर्ण होणे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी नमूद केलंय. एकीकडे भ्रष्ट प्रशासन आणि सरकार मलिदा खात आहे आणि दुसरीकडे त्यांच्या हावरटपणाची फळे मुंबईकरांना भोगावी लागत असल्याची टीका आदित्य यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -