घरमहाराष्ट्रThackeray Group : ठाकरे गटाचे शिलेदार करणार लोकसभेचा प्रचार, यादीत 40 जणांचा...

Thackeray Group : ठाकरे गटाचे शिलेदार करणार लोकसभेचा प्रचार, यादीत 40 जणांचा समावेश

Subscribe

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही आज (ता. 30 मार्च) स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांच्यासह 40 जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यातही लोकसभेचे पहिल्या टप्प्याचे मतदान हे 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. यासाठी आता सर्वच पक्षांकडून स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही आज (ता. 30 मार्च) स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांच्यासह 40 जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. (Shiv Sena Thackeray group star campaigners list released)

हेही वाचा… BJP : हे कोणत्या नीतिमत्तेत आणि संस्कृतीत बसते? ठाकरे गटाचा भाजपाला सवाल

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, विधान परिषदेचे आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांच्या नावाचा समावेश आहे.

तसेच, शिवसेना नेत्यांबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी महापौर विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे, संजय जाधव, माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी ही स्टार प्रचारकांची फौज जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे ठाकरे गटाचे हे स्टार प्रचारक केवळ शिवसेना ठाकरे गटाचाच प्रचार करणार की महाविकास आघाडीचाही प्रचार करणार, हे देखील स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे ठाकरे गटाकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -