पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात शिवसेना करणार ‘या’ दिवशी राज्यव्यापी आंदोनल

पेट्रोल डिझेलच्या किंमती कधीही शंभरीचा आकडा पार करु शकतात. त्यामुळे देशातील जनतेत नाराजी आणि असंतोष पहायला मिळत आहे. या काळात शिवसेना लोकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढिविरोधात शिवसेना राज्यात तीव्र आंदोलन करणार आहे.

Petrol Diesel Price: Rise in petrol price in Mumbai, see what is today's rate
Petrol Diesel Price: मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत वाढ, पहा काय आहे आजचा दर

कोरोनाच्या काळात आर्थिक घडी विस्कटल्यामुळे अनेक संकटाना सामोरे जावे लागले. या काळात अनेकांच्या नोकऱ्या देखिल गेल्या. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना मोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले. पेट्रोल डिझेलचे सतत वाढते दर हे सर्वसामान्यांना न परवडणारे झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पातही पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढविण्यात आल्या. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधीही शंभरीचा आकडा पार करु शकतात. त्यामुळे देशातील जनतेत नाराजी आणि असंतोष पहायला मिळत आहे. या काळात शिवसेना लोकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढिविरोधात शिवसेना राज्यात तीव्र आंदोलन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ५ फेब्रुवारी रोजी ११ वाजता शिवसेना पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून लोकांना सततच्या महागाईला समोरे जावे लागत आहे. सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्याची नीती केंद्रसरकारकडे नाही. महागाईच्या समस्येतून सर्वसामान्य जनतेला बाहेर काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचे आदेश दिले. केंद्रसरकार हे आंदोलन राज्यभारातील जिल्ह्याधिकारी कार्यालये आणि शासकीय कार्यालयांसमोर केली जाणार आहेत. सायकल, बैलगाड्या मार्च काढूव केंद्र सरकारविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा तीव्र निषेध केला जाणार आहे.

या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक दाखल होतील. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ५ फेब्रुवारीला इंधन दरवाढीविरोधात राज्यव्यापी आंदोलन करु असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. शिवसेनेच्या आंदोनलामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – ‘अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन शिष्यवृत्ती द्या’