Homeताज्या घडामोडीUddhav Thackeray : ठाकरे गटाचे मुंबई महापालिका एकटं लढण्याचे संकेत; शिवसैनिकांची तयारी...

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे मुंबई महापालिका एकटं लढण्याचे संकेत; शिवसैनिकांची तयारी बघून निर्णय घेणार

Subscribe

मुंबई – मुंबई महापालिका निवडणूक एकटं लढू, असे संकेत शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांचे म्हणणे आहे एकटं लढा. पण मी कार्यकर्त्यांच्या विचाराने निर्णय घेणार आहे. तुमची तयारी बघून नंतर निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे जंयतीनिमित्त अंधेरी येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार निशाणा साधला. अमित शहांना सांगतो, जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला जाल असा इशारा दिला आहे.

सर्वांचं म्हणणं आहे, एकटं लढा…

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेना ठाकरे गटाचा अंधेरीमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवसैनिकांना संबोधित करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदींच्या अश्वमेधाचा गाढव महाराष्ट्राने रोखला होता. त्यामुळे आपण गाफिल राहिलो आणि विधानसभेत पराभव झाला. आता आगामी निवडणुकांबद्दल सर्वांशी बोलत आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, एकटं लढा, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमची तयारी बघून निर्णय घेणार 

शिवसेना ठाकरे गटाने आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित कताना म्हणाले की, सर्व पदाधिकाऱ्यांशी बोलत आहे. सर्वांशी बोलून झालं आहे, त्यांचे म्हणणे आहे की एकटं लढा. मात्र मी शिवसैनिकांच्या मनाने निर्णय घेणार आहे. मला सूड उगवून पाहिजे. जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, मराठी आईशी गद्दारी करतो त्याचा सूड उगवून पाहिजे. असे आवाहन करत उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमची तयारी बघून नंतर मी निर्णय घेईल. उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्या जाहीर सभेत स्वबळाची तयारी दाखवली आहे. तर तुमची तयारी बघून निर्णय घेऊ म्हणत, महाविकास आघाडीला लगेच दुखवाचे नाही, असा सावध पवित्रा घेतला असल्याचे दिसले.

उद्धव ठाकरेंचा अमित शहांना इशारा… 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिर्डी येथील भाजपच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, मला माझी जागा दाखवणारे हे माझ्या समोर आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी अमित शहांना सांभाळून बोलण्याचा सल्ला वजा इशारा दिला. ते म्हणाले की, अमित शहांना सांगतो जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला जाल. प्रेमाने वागाल तर उचलून घेऊ, कपटाने वागल तर तिथेच आपटू, असा इशाराही त्यांनी भाजप आणि अमित शहांना दिला.

हेही वाचा : Uddhav Thackeray : औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शहा काय; उद्धव ठाकरेंचा इशारा