Homeताज्या घडामोडीShiv Sena UBT : लोकसभा, विधानसभाच स्वबळावर लढायची गरज होती; अरविंद सावंतांचं...

Shiv Sena UBT : लोकसभा, विधानसभाच स्वबळावर लढायची गरज होती; अरविंद सावंतांचं मोठं वक्तव्य

Subscribe

मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्याला दुजोरा देत खासदार अरविंद सावंत यांनी मोठं आणखी वक्तव्य केले आहे.

मुंबई : मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्याला दुजोरा देत खासदार अरविंद सावंत यांनी मोठं आणखी वक्तव्य केले आहे. लोकसभा विधानसभाचं स्वबळावर लढायची गरज होती, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केले. (Shiv Sena UBT MP Arvind Sawant on contest the elections on his own)

“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार खासदार संजय राऊत यांनी नागपुरात सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असं वक्तव्य केले. पण खरंतर आता ही आम्हा सर्व शिवसैनिकांचेही तेच मत आहे. पक्ष म्हटला तर पक्षातील कार्यकर्तांना संधीच मिळत नाही. यासगळ्यात मागचं काढून कोणावर टीका करण्याचा संबंध नाही”, असे अरविंद सावंत यांनी म्हटलं

“शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भरभक्कमपणे उभी आहे. तसेच, एकाकी लढल्याशिवाय त्या शिवसेनेची ताकद समजणार नाही. लोकही जेव्हा संभ्रमात असतात, तेव्हा त्यातून मार्ग निघेल. खरंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही स्वबळावर लढण्याची आवशक्यता होती. पण आता आपण पक्षाच्या कार्यकरत्यांना संधी कुठे देऊ शकतो तर, महापालिका निवडणूक, जल्हा परिषद, नगरपंचायत त्यांना संधी देऊ शकतो. मात्र, त्यांना संधी द्यायची झाल्यास निर्णय घेताना निराकारण होत नाही. त्याला फार वेळ लागतो. त्यामुळे स्वबळावर लढावं आणि संजय राऊतांनी जी घोषणा केली ती निश्चितच स्वागतार्ह आहे”, असेही वक्तव्य अरविंद सावंत यांनी केले.

“अनेकदा शिवसैनिक आम्हाला म्हणतात की, एकटे लढलो असतो तर 20 पेक्षा अधिक निवडून आले असते. मागील काळात युती तुटली होती. उद्धव ठाकरे एकटे होत. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 63 आमदार निवडून आले होते. तो अनुभव गाठीशी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबतची सद्भावना आहे. काही शंका असतील तर, एकत्र लढल्यास त्या शंकांचे निरसन होते”, असेही अरविंद सावंत म्हणाले.


हेही वाचा – मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार – राऊत

Vaibhav Patil
Vaibhav Patil
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.